रायगड लोकधारा वृत्तसेवा :
महाड / रायगड : वलंग शिक्षण प्रसारक मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयात मंगळवार दिनांक १०/३/२०२६ रोजी संस्थेचे कार्यवाह मा.श्री.राजन कुर्डूनकर सर यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक-पालक सभा संपन्न झाली. प्रास्ताविकात मुख्याध्यापक मा.गंगाधर साळवी सर यांनी उपस्थित पालकांचे स्वागत केले व सभेचा उद्देश कथन केला. येत्या द्वितीय सत्र परीक्षेत विद्यार्थ्यांनी यश संपादन करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे,नियमित शाळेत उपस्थित राहायला पाहिजे हे सांगितले. कार्यवाह श्री.कुर्डूनकर सर यांनी दीर्घ सुट्टीनंतर विद्यार्थ्यांनी गैरहजर न राहता नियमांचे पालन करून उपस्थित रहावे. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर परिश्रम अत्यावश्यक आहेत. पालकांनी आपल्या पाल्याकडे दक्षतेने लक्ष देणे गरजेचे आहे,असे आपल्या मनोगतात सांगितले. पालकांमार्फत श्री.उत्तम जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी विशेष चर्चा करण्यात आली. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांनी आरोग्यविषयक काळजी घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. सभेसाठी शिक्षिका सौ अश्विनी घरटकर मॅडम,श्री.गणेश कोळी सर,मीनाक्षी राऊत मॅडम,दीपेश जाधव सर उपस्थित होते. श्री.गणेश कोळी सरांनी सूत्रसंचन केले तर श्री. दीपेश जाधव सरांनी आभार मानले. चहापानानंतर सभा संपली.
