रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतीनीधी / सतिश पाटील : सदर नाला हा मुलुंड शहरातून येणारा घनकचरा सरळ ठाणे खाडी अर्थात ( Thane creek flamingo sanctuary, world heritage Ramsar site) येथे विना अडथळा जाऊन तेथील कांदळवन, माशांची प्रजनन स्थाने यांच्यावर साचून तेथील जैवविविधततेला गांभीर धोका पोहोचवित आहे.
या संदर्भात 2024 रोजी माननीय राष्ट्रीय हरित लवाद पुणे येथे याचिका दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने माननीय न्यायालयाने सुमारे 10 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आदेश दिले होते जेणेकरून मुलुंड ते विक्रोळी येथे स्थित असलेले उघडेश्व् नाले ज्यातून सातत्याने प्लास्टिक घनकचरा जाळ्या बसवून अडविण्यात येत तो सरळ ठाणे खाडीत जाण्यापासून रोखला जावा.
एकंदरीत सहा लोकेशन पैकी आजतागायत फक्त दोन ठिकाणी जाळ्या ( Trash boom) बसविण्यात आल्या आहेत बाकी सब राम भरोसे. प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी अशी अपेक्षा आहे.
हि माहिती पर्यावरणप्रेमी, समाज सेवक, माहीती अधिकार नंदकुमार पवार यांनी दिली.
