रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील /
इचलकरंजी कबनूर येथे इचलकरंजी (कबनूर) येथे दारूच्या नशेत रोज होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे।घटनेचा तपशील:मृतक: बाळू बापू बामणे (वय ५८, रा. कबनूर, शिवाजी कॉर्नर), असे मृताचे नाव असून ते एक माजी सैनिक होते।आरोपी: पत्नी सुनीता बाळू बामणे (४५) आणि दोन मुले – यश (२०) व ओम (२३) बामणे।कारण: बाळू बामणे यांना दारूचे प्रचंड व्यसन होते. मद्यप्राशन करून ते पत्नी व मुलांशी रोज भांडण, शिवीगाळ आणि मारहाण करत असता, ९ मे २०२६ च्या सुमारास, बामणे यांच्या पाठीत धारदार शस्त्राने खोलवर वार करून त्यांचा खून करण्यात आला. घटनेनंतर पत्नी आणि मुलांनी, “बाळू बामणे दारूच्या नशेत काचेच्या टेबलावर पडल्याने जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला,” असा बनाव रचला. जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांना संशय आला. शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, सुरुवातीला मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच पत्नी व मुलांनी मिळून खून केल्याची कबुली दिली।शिवाजीनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला असून तिन्ही संशयितांना अटक करण्यात आली आहे। दारूच्या नशेत रोज होणाऱ्या छळाला कंटाळून पत्नीने दोन मुलांच्या मदतीने पतीचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.गृहमंत्री, सरकार मायबाप जर गुजरात मध्ये दारूबंदी आहे मग महाराष्ट्रात का करू शकत नाही किती संसार उधवस्त होण्याची वाट पाहत आहेत अशा दारु विक्रीतून मिळालेला महसूल म्हणजे विषाची परीक्षा नाही का? मनावर घेतले तर असे नशेमुळे गुन्हेगारीला चाप बसेल, अनेकवेळा बलात्कार, दारु पिऊन वाहन अपघात व गुन्हेगारी ही नसेतच झालेले उघड झाले आहे मग यावर आत्मचिंतन होणे जरूरी आहे.रात्रीचे उशीरा चालणारे डान्सबार येथे लोक चहा पियायला जात नाहीत.हे जगजाहीर आहे. तरूण पिढीदेखील मोठ्या संख्येने नसेच्या आहारी जात आहेत कॉलेजचे विद्यार्थी मुल मुली सिगारेट, नशा करणारे नाक्यावर सर्रास दिसतात याला आळा बसेल का? हे एक उदाहरण आहे अशा अनेक घटना होत असतात.
