रायगड लोकधारा वृत्तसेवा :
विजय गायकर / महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच तमाम भारतीयांना ‘काटकसर’ करण्याचं आवाहन केलं. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, सोनं खरेदी थांबवा, परदेशात जाणं टाळा… हे ऐकायला खूप छान वाटतं! पण साहेब, प्रश्न असा आहे की ही काटकसर फक्त सामान्य जनतेनेच का करायची?
देशाची अर्थव्यवस्था कमकुवत झाली असेल, तर त्याला फक्त ‘इराण-इस्रायल युद्ध’ जबाबदार नाही, तर सरकारची धोरणेही तितकीच कारणीभूत आहेत. जरा वास्तवावर नजर टाकूया:
🔥 १. स्वतःची उधळपट्टी आणि जनतेला सल्ले:
तुम्ही आणि तुमचे मंत्री शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन फिरता, देशभरात हजारो कोटी रुपये खर्च करून रोड-शो करता, स्वतःवर फुलांची उधळण करून घेता… तेव्हा पेट्रोल-डिझेल फुकट येतं का? निवडणुकीच्या काळात हजारो गाड्यांमधून जो वारेमाप खर्च होतो, तेव्हा देशाच्या तिजोरीची आठवण येत नाही का? स्वतः १५ मे पासून ५ देशांच्या दौऱ्यावर जायचं आणि जनतेला मात्र ‘परदेशात जाऊ नका’ असे सल्ले द्यायचे, ही कोणती दुटप्पी भूमिका?
⛽ २. पेट्रोल-डिझेलच्या किमतीचं सत्य:
आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव ९०-१०० डॉलर्स आहेत हे खरं आहे. पण मनमोहन सिंग पंतप्रधान असतानाही हे भाव इथवर पोहोचले होते. त्यांनी कधी देशाला ‘गाड्या कमी चालवा’ असं सांगितलं नाही! आणि जेव्हा कच्च्या तेलाचे भाव ६० डॉलर्सवर आले होते, तेव्हा जो भरमसाठ टॅक्स लावून तुम्ही लाखो कोटी रुपये कमावले… ते पैसे गेले कुठे? त्याचं उत्तर कोण देणार?
💸 ३. रुपयाचं प्रचंड अवमूल्यन:
इराण-इस्रायल युद्धाच्या नावाखाली स्वतःचे अपयश लपवू नका. तुम्ही पंतप्रधान झाल्यापासून रुपयाचं जे अवमूल्यन झालं आहे, ते कशामुळे झालं? तुमच्या १० वर्षांच्या काळात रिझर्व्ह बँकेच्या (RBI) तीन गव्हर्नर्सनी राजीनामे का दिले? तुम्ही अर्थतज्ज्ञ नाहीत, पण जे खरे तज्ज्ञ आहेत त्यांची ‘मन की बात’ तरी कधीतरी ऐका!
🎁 ४. रेवडी संस्कृती आणि डबघाईला आलेली अर्थव्यवस्था:
एकीकडे ‘रेवडी संस्कृती’वर (Freebies) टीका करायची आणि दुसरीकडे निवडणुका जिंकण्यासाठी ‘लाडकी बहीण’ सारख्या योजना आणून राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडायचं! महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याऐवजी, तुटपुंजे पैसे वाटायचे आणि तेच पैसे वाढत्या महागाईच्या रूपाने त्यांच्याच खिशातून परत काढायचे. हा कोणता न्याय?
📉 ५. विदेशी गुंतवणुकीचा पोकळ दावा:
गेल्या अवघ्या तीन महिन्यांत विदेशी गुंतवणूकदारांनी शेअर बाजारातून जवळपास दीड लाख कोटी रुपये काढून घेतलेत. देशात विदेशी गुंतवणूक येत नाहीये, आणि साहेब थंड हवेच्या देशात जाऊन ‘भारतीय’ कंपन्यांसोबतच करार करत आहेत!
माझी पंतप्रधानांना थेट विनंती आहे:
नैतिकतेचे डोस पाजणे आता बास करा! लालबहादूर शास्त्रींनी आवाहन करण्याआधी स्वतः कृती केली होती. आधी स्वतःच्या पक्षाची उधळपट्टी थांबवा, स्वतःचे परदेश दौरे रद्द करा. संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि देशाला खरं सांगा की ही आर्थिक आणीबाणी का ओढवली आहे?
प्रश्न विचारणे हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही तो विचारणारच!
जागे व्हा! जर तुम्हालाही वाटत असेल की देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी स्थिती लपवली जात आहे आणि सरकारच्या चुकांचा भुर्दंड सामान्य जनतेच्या माथी मारला जात आहे, तर ही पोस्ट जास्तीत जास्त SHARE करा! 📢
