Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा / डोंबिवली प्रतिनिधी : पूर्वेकडील टिळक चौक येथील एस.बी. आय बँकेसमोर सुरू असलेल्या खोदकामादरम्यान शेजारील प्रभागास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याचे निदर्शनास आले. या घटनेची माहिती तत्काळ कल्याण ग्रामीण आमदार राजेश मोरे यांना समजली. मोरे यांनी संबंधित व्यवस्थेतील अधिकाऱ्यांना दिल्याने पाण्याचा मोठा अपव्यय टाळता आला.
टिळक चौक येथील एस.बी.आय बँकेसमोर सुरू असलेल्या खोदकामादरम्यान नजीकच्या प्रभागास पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याची घटना निदर्शनास आले. एकच जागरूक नागरिकांकडून या विषयाची माहिती मिळताच आमदार राजेश गोवर्धन मोरे यांनी सदर बाबीचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच पाणीपुरवठा विभागास मुख्य वॉल त्वरित बंद करण्याच्या सूचना देऊन पुढील पाण्याचा होणारा अपव्यय थांबविण्यात आला.
यावेळी संबंधित कंत्राटदारास जलवाहिनीच्या दुरुस्तीबाबत आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी तत्परतेने कार्यवाही करण्यात आली. यावेळी युवासेना जिल्हा अध्यक्ष जितेन पाटील, सुनील मांडलेकर, कार्यकारी उप अभियंता पाणी पुरवठा विभाग व समस्थ शिवसैनिक होते.
