रायगड लोकधारा वृत्तसेवा :
शिवसेना- भाजप मधील अंतर्गत गटबाजी वाढलेली इच्छुकांची संख्या ,नाराजीनाट्यामुळे निवड प्रक्रिया लांबणीवर गेल्याची चर्चा…
रायगड लोकधारा प्रतिनिधी /कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिकेचे निवडणूक जानेवारी महिन्यात पार पडली त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात महापौर उपमहापौर महिना त्यानंतर महिनाभरातच स्थायी समिती सभापती निवड झाली .मात्र याचदरम्यान स्वीकृत नगररसेवक निवड प्रक्रिया होणे अपेक्षित असताना साडेतीन महिने उलटूनही स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीला मुहूर्त मिळालेला नाही . शिवसेना भाजप मधील अंतर्गत गटबाजीमुळे प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे इच्छुकांची संख्या वाढल्याने आता पक्षांतर्गत नाराजी वाढले असून ती लोकनाचा आवाहन शिवसेना भाजप समोर उभं ठाकलंय ..
नव्या प्रशासकीय रचनेनुसार महापालिकेत १२१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानुसार १० स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार आहे. पक्षीय बलाबलानुसार शिवसेनेचे पाच, भाजपचे चार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक सदस्य स्वीकृत म्हणून निवडला जाणार असल्याची शक्यता आहे.
महापालिकेत मनसेने शिवसेनेला पाठिंबा दिल्याने कोट्यातील पाचपैकी एक स्वीकृत सदस्यपद मनसेला देण्याची चर्चा आहे. मात्र, सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमधील मतभेद, राजकीय कुरघोड्या आणि गटबाजीमुळे स्वीकृत नगरसेवक नियुक्तीची प्रक्रिया रखडली आहे.एकीकडे पक्षातील मातब्बर पदाधिकारी स्वीकृत नगरसेवक पदाकडे डोळे लावून बसलेले आहेत .तर दुसरीकडे महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराकडून देखील स्वीकृत पदासाठी जोरदार फिल्डिंग सुरू असल्याने शिवसेना भाजप वरिष्ठ नेत्यांसमोर आवाहन उभं ठाकलं आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांची निवड कधी होणार याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून आहे.
