रायगड लोकधारा वृत्तसेवा :
दिनांक : 15 मे 2026
मुंबई प्रतिनिधी : सतिश पाटील / मुबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात झाला. ३ मालवाहतूक ट्रक एक्स्प्रेस वेवर उलटले.
या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर एक्सप्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्यावरून मुंबईला जाणाऱ्या लेनवर हा अपघात झाला आहे. त्यामुळे मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प झाली आहे. मिसिंग लिंक रोड संपतो त्याच ठिकाणी हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.मिसिंग लिंक जोड रस्ता पासून ते मिसिंग टनल पुर्णपणे सर्व लेन जाम झाले सुरुवातीला अपघाताचे कारण समजत नव्हते नंतर वाहन प्रवासी चालत गेल्यावर समजलं का मोठा भीषण अपघात झाला आणि मालवाहू कंन्टेनर, ट्रक अपघात होऊन रस्त्यावर आडवे झाले त्यामुळेच वाहतूक ठप्प झाली होती.नविन मिसिंग लिंक रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात होत आहेत काही शेल्फी व फोटो शुट मुळे पण आजचा विचित्र अपघात ट्रक चालकाच्या चुकीने घडला आहे. तरी आजपर्यंत विशेष दक्षता या ठिकाणी घेतली जात नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेवर ३ ट्रकला अपघात झाला आहे. ट्रकमधील सामान आणि पेंट सदृश्य साहित्य रस्त्यावर विखुरल्याने वाहतुकीस अडथळा आला आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंक जोड रस्त्यावर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. या अपघातामुळे केवळ एकच लेन सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अपघातात २ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती आगे. या अपघातानंतर घटनास्थळावर पोलिस, बचाव पथक आणि मदत पथक दाखल झाले आहे.

