रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण : अखिल भारतीय आगरी समाजिक संस्था आयोजित राष्ट्रीय आगरी अध्यात्मिक संमेलन माननीय गणेशजी नाईक वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 15 मे 2026 रोजी पेण नगरपालिका मैदानावर संपन्न झाले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अध्यात्मिक क्षेत्रातील प.पू.सदानंद महाराज तुंगारेश्वर वसई. पुरुषोत्तम आनंद पुरी महास्वामी भगीरथ पीठ कर्नाटक . ब्रह्मचारी तपस्वी यांनी उपस्थिती लावली. तसेच मान्यवर म्हणूनरवींद्रजी पाटील आमदार पेण, महेंद्रजी दळवी आमदार अलिबाग, प्रितमताई पाटील नगराध्यक्षा, पेण नगरपालिकेचे आगरी समाजाचे नगरसेवक, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले व रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील अध्यात्मिक क्षेत्रात समाज प्रबोधनाचे, समाजाला सुसंस्कार घडवण्याचे, नव्या पिढीला अध्यात्मिक दिशा देण्याचे उल्लेखनीय कार्य केले आहे. असे प्रवचनकार, कीर्तनकार, वाद्यरुंद गायक.अशा विद्याविभूषत मान्यवरांना सन्मानपत्र, ट्रॉफी, शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी इंचगिरी रसाळ संप्रदायाचे कोकण सचिव ह.भ.प.कृष्णा महादेव वर्तक आदर्श व्यक्तिमत्व, प्रवचनकार ,समाज प्रबोधनकार, यांचे अध्यात्म कार्य, राष्ट्रीय कार्य, सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहे . यांना कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर मा रवीशेठ पाटील साहेब विद्यमान आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री यांच्या हस्ते सन्मानपत्र, ट्रॉफी, शाल, पुष्पगुच्छ देऊन वर्तक यांना सन्मानित केले. त्यांचे हे टिपलेले छायाचित्र. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी सूर्यकांत पाटील, अखिल भारतीय सामाजिक संस्था अध्यक्ष, डॉ.सिद्धार्थ पाटील उपाध्यक्ष, संजय गणेश ठाकूर कार्याध्यक्ष, निलेश पाटील धनाजी भगत सर चिटणीस व सर्व कमिटी सदस्यांनी परिश्रम घेतले.या पुरस्काराबद्दल सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांनी वर्तक सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कृष्णा वर्तक सरांवर सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
