रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते तथा विद्यमान नगरसेवक परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत पनवेल येथील पांजरपोळ गोशाळेत प्राण्यांसाठी एका विशेष शिबिराचे अत्यंत स्तुत्य आयोजन करण्यात आले होते. मुक्या प्राण्यांची काळजी घेण्याच्या आणि त्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने हे शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन नगरसेवक परेश ठाकूर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अर्चना परेश ठाकूर यांच्याहस्ते झाले. मिनिस्ट्री ऑफ पेट्सफ्वे यश संजय जैन यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पांजरपोळ गोशाळेत झालेल्या शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली प्राण्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक राजू सोनी, सुमित झुंझारराव, नितीन मुनोथ, संजय जैन, युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष आनंद ढवळे, आदेश ठाकूर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
