रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. २९ ( विठ्ठल ममताबादे ) : २ मे ते ४ मे रोजी उरणमधिल आर्ट क्रियेशन या फाईन आर्ट अकॅडेमी मार्फत विद्यार्थ्यांच्या चित्रांचे प्रदर्शन उरण शहरातील बाझारपेठला लागून असलेल्या गणपती चौकातील राम मंदिर हॉल येथे भरवण्यात येणार आहें. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची ३००चित्रे लावण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांनी साकारलेली विविध सुंदर आकर्षक असे चित्रे सर्वांना पाहता येतील. तसेच या वार्षिक कला प्रदर्शनात इंटरनॅशनल आर्टकंपेटिशन चा निकाल आणि पारीतोषीके दिली जाणारआहेत.या प्रदर्शनासाठी सिने अभिनेते समीर धर्माधिकारी , उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, जे. के फाईनआर्ट कॉलेज मुंबईचे प्राध्यापक गणेश हिरे, उरण ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर निशिकांत सावंत , प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक गायक देवेंद्र पाटील,गायिका वृषाली पाटील , आणि प्रसिद्ध निवेदक लेखक शिव व्याख्याते धिरेंद्र ठाकूर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हे प्रदर्शन सर्वांना दिनांक २ मे ते ४ मे पर्यंत पाहता येईल. नागरिकांनी, रसिक प्रेषकांनी, कला प्रेमींनी या प्रदर्शनाला मोठया प्रमाणात भेट द्यावी. प्रदर्शनाचा मोठया प्रमाणात आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
