⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
प्रत्यक्ष भेट देऊन वधू वरांना दिले शुभाशीर्वाद….
उरण दि. १६ विठ्ठल ममताबादे : प्रेमाची सावली, ओमकार कॉलनी, कुंभारवाडा, तालुका उरण, जिल्हा रायगड येथील सौ/श्री सुजाता विकास रामदास ठाकूर यांची कन्या कुमारी पूजा हिचा माजगाव, तालुका मुरुड, जिल्हा रायगड येथील सौ / श्री संध्या अरविंद कृष्णा भंडारी यांचे सुपुत्र कुमार संकेत याच्याशी रविवार दिनांक १५/६/२०२५ रोजी मल्टीपर्पज हॉल जेएनपीटी, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे साखरपुडा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला.कुमारी पूजा व कुमार संकेत यांच्या साखरपुडा समारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली होती. यावेळी काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत, उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेशशेठ बालदी व संतोष चौधरी (दादूस )यांनी साखरपुडा समारंभात हजेरी लावत कुमारी पूजा व कुमार संकेत यांना शुभाशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. कुमारी पूजा व कुमार संकेत हे दोघे लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनात अडकणार असून त्या पूर्वी उरण मध्ये त्यांचा साखरपुडा समारंभाचा कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभाशीर्वाद देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विकास रामदास ठाकूर, सुजाता विकास ठाकूर, अजित वासुदेव ठाकूर, अपर्णा अजित ठाकूर, ठाकूर कुटुंब,भंडारी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्र परिवार,उद्योजक दीपक भास्कर ठाकूर, विलास भास्कर ठाकूर, विकास पांडुरंग ठाकूर, प्रणित वासुदेव पाटील, विनय पाटील,माजी सरपंच:- लक्ष्मण सदानंद ठाकूर,माजी सरपंच:- मनोज वासुदेव भगत,सरपंच ग्रामपंचायत नागव:- चंद्रकांत गायकवाड,पंचायत समिती उरण:- सदस्य दीपक ठाकूर,भारतीय जनता पार्टी अध्यक्ष उरण रवी भोईर,उरण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे,पत्रकार संजय गायकवाड,न्यू मॅरीटाईम अँड जनरल कामगार संघटना सरचिटणीस वैभव पाटील,रायगड जिल्हा इंटक अध्यक्ष किरीट पाटील,महाराष्ट्र युवक इंटक उपाध्यक्ष :- लंकेश हिरामण ठाकूर,उरण तालुका इंटक अध्यक्ष :- संजय ठाकूर, परशुराम भोईर,ग्रामपंचायत भेंडखळ सदस्य – लिलेश्वर भगत, स्वाती पाटील, स्वाती घरत, सोनाली ठाकूर, अक्षता ठाकूर,अजित ठाकूर,रायगड जिल्हा शेकाप सदस्य :- ययाति भगवान ठाकूर,बोकडविडा ग्रामपंचायत माजी सदस्य राकेश पाटील,भेंडखळ काँग्रेस अध्यक्ष प्रमोद ठाकूर, भेंडखळ काँग्रेस पदाधिकारी सुरेश ठाकूर आणि इतर भेंडखळ काँग्रेस पदाधिकारी व विकास ठाकूर यांचे मित्र परिवार नातेवाईक,भेंडखळ गावातील सर्व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.



