🔴 रायगड लोकधारा वृत्त :
अविनाश जाधव वार्ताहर : कळंबोली रोडपाली प्रतिनिधी :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत सर्वांची कुलस्वामिनी तुळजापूरची आई तुळजाभवानी मातेचे साक्षात मंदिर गाभाऱ्याची प्रतिकृती उभे राहून कळंबोली येथे नवरात्र उत्सवाला सुरुवात.
रोडपाली कळंबोली येथील नवीन बस डेपो येथील प्रांगणामध्ये श्री दत्त चॅरिटेबल ट्रस्ट रोडपाली यांच्यातर्फे श्री तुळजाभवानीची मूर्ती साकारण्यात आलेली आहे. कळंबोली येथील सर्व भाविक भक्त साक्षात तुळजापूरला दर्शन घेतले असे वाटत आहे असे अभिप्राय देत आहेत. या नवरात्रोत्सवाचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल विधानसभा समन्वयक श्री प्रदीप ठाकूर रोडपाली यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आले.
रोडपाली येथे स्थापन केलेली ही प्रतिकृती सहा फूट उंच व चार फूट रुंद आईची मूर्ती आहे. आईचा साज, आईची नथ, दागदागिने व दररोज बदलणाऱ्या रोजच्या रंगीत साड्या मुळे भाविकांना जणू आपण तुळजापूरच्या देवीचे दर्शन घेत आहोत असे साक्षात्कार होत आहे. मी तुळजाभवानी देवीच्या समोर गरबा, दांडिया, हरिपाठ भजन, अध्यात्मिक कार्यक्रम यांच्या आयोजन केले आहे जात आहे. कळंबोली आणि रोडपाली परिसरामध्ये आई तुळजाभवानीच्या देवीच्या समोर नतमस्तक होऊन सर्व परिसरामध्ये भक्ती मी असे वातावरण निर्माण झाले आहे.
देवीच्या दर्शनासाठी कळंबोली रोड पाली बस डेपोला आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होत आहे
