🔴 रायगड लोकधारा वृत्त :
उरण दि. २७ / विठ्ठल ममताबादे : उरण तालुक्यातील धुतुम गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी धुतुमचे गाव अध्यक्ष समाधान कृष्णा कटेकर यांचा वाढदिवस धुतुम गावात मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट ) चे उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, महिला उरण तालुका अध्यक्ष कुंदाताई ठाकूर, रायगड जिल्हा सरचिटणीस प्रविण राम ठाकूर, रमण कासकर, नामदेव मढवी, दिनेश पाटील, लीलाधर घरत,एम. जी. वेअर हाऊस चे मालक मनोहर मच्छिंद्र ठाकुर, धुतुम गाव उपाध्यक्ष सुनिल आत्माराम ठाकुर,दिलीप ठाकुर, मारुती पाटील, मेघनाथ ठाकूर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. वडिलांची पार्श्वभूमी ही अध्यात्मिक,धार्मिक होती. वडिलां प्रमाणेच त्यांचाच वारसा पुढे चालवीणाऱ्या समाधान कटेकर यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. समाधान कटेकर यांच्या पत्नी भारती कटेकर यांचीही मोलाची साथ प्रत्येक समाज कार्यात समाधान कटेकर यांना लाभत असते. त्यांचेही कौतुक यावेळी करण्यात आले.



