रायगड लोकधारा वृत्तसेवा :
🗓️ 23 जानेवारी 2026
रायगड लोकधारा प्रतिनिधी / निजामपूर : निजामपूर येथे आगामी रायगड जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत आगामी निवडणुकांची तयारी, संघटनात्मक मजबुती, मतदारांशी थेट संपर्क, बूथ पातळीवरील नियोजन तसेच प्रचार यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी संबोधित करताना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या निवडणुकांमध्ये आपण विजय मिळवला, तर आपल्या गावांचा आणि भागाचा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे विकास करता येईल. आता प्रत्येक शिवसैनिकाने सज्ज व्हायचे आहे, कामाला लागायचे आहे आणि शिवसेनेचा भगवा जिल्हा परिषदवर फडकवायचा आहे .

येत्या काळात प्रत्येक गाव, वाडी-वस्ती आणि प्रत्येक बूथ स्तरावर नियोजनबद्ध प्रचार, मतदार नोंदणीची पडताळणी, युवा व महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग आणि शिस्तबद्ध व एकसंघ पद्धतीने काम करण्यावर विशेष भर देण्याचे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले.
या प्रसंगी शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.
