रायगड लोकधारा वृत्तसेवा :
वलंग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयाचे माजी विद्यार्थी अभ्यासू दिलदार मनमिळावू व्यक्तिमत्व आदरणीय कै.अनंत जनार्दन रेवाळे यांचे दिनांक : २० जानेवारी २०२६ रोजी सानपाडा नवी मुंबई येथे फोर्टिस रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते. त्यांच्या जाण्याने वलंग शिक्षण प्रसारक मंडळ,न्यू इंग्लिश स्कूल वलंग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मुलांचे वसतिगृह वलंग,पालक व विद्यार्थी वर्ग यांमध्ये दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्यांच्या शरीरातील महत्त्वपूर्ण अवयवांचे रुग्णालयाला दान केले. हे दान सर्वांना अनुकरणीय आहे, याबद्दल रुग्णालय आणि मिलेनियम टॉवर्स सेक्टर ९,सानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांना हृदयपूर्वक मानवंदना देण्यात आली. त्यांचे मूळ गाव महाड तालुक्यातील खैरे आहे. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,मुलगी,जावई आणि नात असा परिवार आहे.
