रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कर्जत | गणेश पवार : ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच, नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील मौजे ममदापूर गाव नेरळ गावच्या सिमेवरील असलेल्या टीवाळे नाका परिसरात ममदापूर गावातील तरूणावर मध्यरात्रीचे सुमारास चाकूने हल्ला केल्याची घटना घटली असुन, या संदर्भात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असुन, नेरळ पोलीसांकडून तिघांना अटक करण्यात आली आहे.
विशाल हिसालगे रा. ममदापूर हे बुधवारी मध्यरात्री सुमारे १.१५ वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत आपल्या नेरळ विद्या मंदिर शाळेसमोरील इमारतीमध्ये राहाणाऱ्या मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना, त्याच वेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुरेश टोकरे हे आपल्या उमेदवार पत्नीचा प्रचारदौरा उरकून परत असताना, हॉटेल टीवाले विशाल हिसालगे यांच्या सोबत असलेला मित्र धनेश्वर शिंगे हा टोकरे यांचा जुना कार्यकर्ता असल्याने, व सध्या तो विरोधी शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी युतीच्या उमेदवाराच्या प्रचार करत असल्यान, या प्रचाराच्या मुद्यावरून त्यांनी धनेश्वर शिंगे यांना विचारणा करून रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुरेश टोकरे हे तेथून निघून गेल्याचे व धनेश्वर शिंगे हे त्याच ठिकाणी असलेल्या आपल्या बहिणीच्या खाद्याप टपरी वर मित्र विशाल हिसालगे यांच्यासोबत घडलेल्या प्रकार बाबत चर्चा करत असताना, त्या ठिकाणी माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांचे समर्थक व शिवसेना शिंदे सेनेचे कार्यकर्ते मिलिंद शिंगे यांची त्या ठिकाणी धनेश्वर शिंगे व विशाल हिसालगे यांच्या सोबत शाब्दिक बाचाबाच होऊन विशाल हिसालगे यांना मारहाण करत, मिलिंद शिंगे यांनी आपल्या स्कुटीमध्ये असलेले धारदार शस्त्र बाहेर काढले असता, धनेश्वर शिंदे यांनी अडवले यादरम्यान धनेश्वर यांचा हात त्या धारदार शस्त्राने जखम झाल्याचे त्या नंतर मिलिंद शिंगे यांचे साथीदार रेशब कुरेशी व आमन पटेल या दोघांनी विशाल हिसालगे यांना रस्त्याचे पलिकडे असलेल्या प्रभात हॉटेल येथे नेत त्याच्या वर चाकूने हल्ला केल्याचे जखमी विशाल हिसालगे यांनी दिलेल्या माहितीनुसार बाब समोर येत आहे.
या हल्ल्यात जखमी विशाल हिसालगे यांना उपचारा करीता डिकसळ येथील रायगड हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे. विशाल हिसालगे यांच्या फिर्यादीनुसार नेरळ पोलीस ठाण्यात मिलिंद जनार्दन शिंगे, रेशब कुरेशी व आमन पटेल यांच्या विरोधात खुनाचा पर्यत्नांचा गुन्हा नोंद झाला असुन, या तिन ही आरोपींना नेरळ पोलीसांनी तात्काळ अटक केली असुन, गुन्ह्यातील वापरलेले हत्यार ताब्यात घेतले आहे. तर मिलिंद शिंगे यांच्यावर ३२६, ३२४, ३२३, ४२७, ५०४, ५०६ सारखे गुन्हे दाखल असल्याची बाब देखील समोर येत आहेत. सदर घटनास्थळाची रायगड फॉरेन्सिक टीमंच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली आहे. सदर घटनेचा पुढील तपास हा नेरळ पोलिस ठाण्याचे अधिकारी राहुल वरोटे, पोलिस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे हे करीत आहेत.
हल्ल्यातील जखमी विशाल हिसालगे यांनी घडलेल्या घटनेचे कथन केलेल्यावरून हा त्यांच्यावरील झालेला हल्ला हा राजकीय की पूर्व वैमनस्यातून की कुणाचे सांगण्यावरून की या संदर्भात पोलीस प्रशासनावर कोणाच्या दबावतंत्राचा वापर केला जात आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने, सध्या नेरळ व आजूबाजूच्या परिसरात दबक्या आवाजात चर्चा सूरू असुन, नेरळ पोलीसांच्या तपासातून नेमके काय समोर येणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
