रायगड लोकधारा वृत्तसेवा :
चांगू काना ठाकूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नवीन पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील सूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. वैभव तांबट यांनी दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६रोजी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य व सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील प्राध्यापकांची सदिच्छा भेट घेतली.
डॉ. वैभव तांबट यांनी शैक्षणिक वर्ष २०१८–१९ मध्ये सूक्ष्मजीवशास्त्र विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी नॅशनल काओशुंग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, तैवान येथून पीएच.डी. पदवी संपादन केली असून सध्या ते तैवान येथे पोस्ट-डॉक्टोरल संशोधन करत आहेत.
या भेटीदरम्यान त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील (भाग १ व २) च्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या संशोधनातील अनुभव, आंतरराष्ट्रीय संशोधन संधी तसेच सूक्ष्मजीवशास्त्रातील विविध संशोधन क्षेत्रांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांचे अनुभव व तज्ज्ञ मार्गदर्शन विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात करिअर घडविण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे.
या प्रेरणादायी संवादामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाबाबत उत्सुकता निर्माण झाली असून भविष्यातील संशोधन वाटचालीसाठी त्यांना योग्य दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. वैभव तांबट यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या प्रसंगी सूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख प्रा. निलेश वडनेरे, प्रा. निलीमा तिदार, प्रा. गणेश साठे, प्रा. सौ. अर्चना गांधारकर, डॉ. अन्वेष वेमुला, प्रा. नमिता गरुडे व डॉ. श्वेता हुम्बरवाडी यांनी डॉ. वैभव तांबट यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य :
प्रो.(डॉ.) एस.के.पाटील
चांगु काना ठाकुर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यु पनवेल (अधिकारप्रदत्त स्वायत्त)
