रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मानेगाव बीट मधील कक्ष क्रमांक २९२ पीएफ मधील घटना…
प्रतिनिधी सचिन चौरसिया / रामटेक :- तालुक्यातील उमरी (चिचदा) गावातील सुलोचना राजकुमार भलावी (वय ३०) व राजकुमार भलावी (वय ३५) आदिवासी पती-पत्नी जवळच्या मुरडा जंगलात जलाऊ सरपण आणण्यासाठी गेले असता रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीट मधील कक्ष क्रमांक २९२ पीएफ मध्ये रविवार (दि.८) फेब्रुवारीला दोन अस्वलांनी दाम्पत्यावर अचानक हल्ला चढविला या हल्ल्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाला, असून पती जखमी झाल्याची घटना दुपारी ३.१० मिनिटांच्या सुमारास घडली… प्राप्त माहितीनुसार, भलावी दाम्पत्य रविवारी रामटेक वनपरिक्षेत्रांतर्गत चिचदा उपवन क्षेत्रातील मानेगाव बीट मधील कक्ष क्रमांक २९२ पीएफ मध्ये जलाऊ सरपण आणण्यासाठी गेले होते… सरपण वेचत असताना अचानक अस्वलांनी त्यांच्यावर हल्ला केला… हल्ला करणारे दोन अस्वल होते, अशी माहिती ग्रामस्थांमधून मिळाली आहे… अस्वलांच्या हल्ल्यात पत्नी सुलोचना भलावी यांचा जागीच मृत्यू झाला तर पती राजकुमार हे किरकोळ जखमी झाले… घटनेची माहिती मिळताच रामटेक वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, रामटेक पोलिस तसेच देवलापार येथील वन अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचले व घटनेची चौकशी करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रामटेक येथील उपजिल्हा रुगाणालयात पाठविला… जखमी पतीला सुद्धा उपचारासाठी याच रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे… पुढील तपास चालू आहे…
मातृत्वाचे छत्र हरविले…
भलावी दाम्पत्य रोजमजुरी करून कसाबसा आपला संसाराचा गाडा चालवायचे… त्यांना तीन वर्षांचा मुलगा आणि पाच वर्षांची मुलगी असे दोन अपत्य आहे… पतीपत्नी दोघेही मिळेल ती मजुरी करून आपले व कुटुंबाचे पोट भरायचे… घरी गॅस नसल्याने स्वयंपाक बनविण्यासाठी नेहमी जंगलातून जळावू सरपण आणायचे… ते सरपण आणण्यासाठी गेले असता ही दुर्दैवी घटना घडली. यामुळे मुलांच्या डोक्यावरून मातृत्वाचे छत्र हरविले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
