रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पोलादपूर : मौजे धामणदेवी येथे वैकुंठवासी सदगूरू हरीभक्त पारायण ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने आणि वै. गुरूवर्य श्रीपती बाबा मोरे माऊली यांच्या आशीर्वादाने व परमपूज्य सद्गुरु श्री दादा महाराज मोरे माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली धामणदेवी येथे शनिवार दिनांक : २१ मार्च २०२६ ते शनिवार दिनांक २८ मार्च २०२६ अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुवर्ण महोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्याच्या पहिल्या दिवशी दिनांक : २० मार्च २०२६ रोजी पोलादपूर येथुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून परमपूज्य सद्गुरु दादा महाराज यांना रथात बसून पोलादपूर ते धामणदेवी पर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आले.
आपण आपल्या हिंदू धर्माची संस्कृती, परंपरा टिकून ठेवली पाहिजे, तरुणांनी मंदिरात गेले पाहिजे. देवाचे दर्शन घेतले पाहिजे. तरच आपली संस्कृती, विचार, समाज आणि धर्म टिकेल असे सद्गुरू दादा महाराज मोरे माऊली यांनी सांगितले. त्यांचे अमृततुल्य विचार ऐकण्यासाठी महाड पोलादपूर मधील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे अध्यक्ष श्री जयराम कदम यांनी सांगितले की आमच्या गावचे सुपुत्र उद्योगपती श्री अनंत गणपत कदम साहेब यांचा या कार्यक्रमा करीता मोलाचा वाटा तसेच गावातील सर्व ग्रामस्थ आणि महिला मंडळ व तरूण मंडळ या सर्वांनी येवढा मोठा कार्यक्रम पुर्णत्वास नेण्यासाठी आतोनात प्रयत्न केले या कार्यक्रमात नामांकित किर्तन कार गायणाचार्य व मृदुंगाचार्य यांनी भाग घेतला आणि या कार्यक्रमात १८३ वाचकांनी ज्ञानेश्वरी वाचनात सहभाग घेतला संपूर्ण गावात गुढी उभारुन जणू काय भगवान राम राया अवतरले आहेत असे दाखवून दिले तसेच या यज्ञात हरिपाठाचा आनंद महीला असो किंवा लहान थोरांनी मोठ्या आनंदाने भाग घेतला. पंचक्रोशीतील येणाऱ्या सर्व भाविकांसाठी शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महाप्रसादाचे आणि अल्पोपहाराची व्यवस्था ग्रामस्था कडून करण्यात आली होती आणि हा संपूर्ण कार्यक्रम उद्योजक अनंत कदम साहेब यांच्या प्रयत्नातून युट्यूब वरती लाईव्ह दाखवण्यात आले अशा रीतीने हा तेवढा मोठा कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा करण्यात आला .
सदर अखंड हरिनाम सप्ताहास धामणदेवी शाळेतील सेवानिवृत्त आदर्श शिक्षिका शारदा खारपाटील, आवाज महामुंबईचा चॅनेलचे संपादक तथा पत्रकार उत्कर्ष समिती रायगड जिल्हा अध्यक्ष श्री मिलिंद खारपाटील, पुरोगामी पत्रकार संघ रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे घरत यांनी भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले आणि या अखंड हरिनाम सप्ताहास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
