रायगड लोकधारा न्यूज :

पनवेल प्रतिनिधी : नवीन पनवेल येथील अस्मिता कला, क्रीडा व सांस्कृतिक मित्रमंडळ आणि प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक ०१ फेब्रुवारी रोजी अष्टविनायक पीएल ५ येथे गणेश मुर्ती स्थापना दिवस आयोजित करण्यात आला असून त्यानिमिताने सकाळी १० वाजता धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, प्रमुख पाहुणे म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, चारुशीला घरत, जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, माजी नगराध्यक्ष के. डी. म्हात्रे, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, ज्येष्ठ नेते सी.सी. भगत, माजी नगरसेवक मनोज भुजबळ, संतोष शेट्टी, तेजस कांडपिळे, समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, वर्षा नाईक, वृषाली वाघमारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक माजी नगरसेविका सुशीला जगदीश घरत, पनवेल वैद्यकीय सेलच्या डॉ. अस्मिता घरत यांनी केले आहे.
