Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पोलादपूर : पोलादपूर तालुका येथील सावित्री नदी पात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाच्या नियमांना धाब्यावर बसवत काही वाळू माफियांनी चरई गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून तब्बल ३५ ते ४० ब्रास वाळूचा साठा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री वेळी जागेवर जाऊन प्रत्यक्ष दर्शी आपलीं माती आपली माणसं संघटनेचे संस्थापक श्री राज पार्टे व निलेश कोळसकर तसेच ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष हरिभाऊ पवार सर्व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष दर्शी पितळ उघडे केले
सावित्री नदीपात्रातील वाळू उपशासाठी शासन स्तरावर टेंडर पद्धतीने परवानगी देण्यात येते. पाटबंधारे विभाग यांच्या माध्यमातून रॉयल्टीच्या स्वरूपात अधिकृत परवानगी दिली जाते. मात्र काही वाळू माफिया शासनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करून रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
“आम्ही नदीपात्रातून वाळू काढून आमचे जीवन जगत आहोत,” असा दावा करणारे हेच माफिया दुसरीकडे जेसीबीच्या सहाय्याने अतिरिक्त वाळू उपसा करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नदीपात्राचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणीय समतोल धोक्यात येत आहे.
आपली माती आपली माणसं संघटनेच्या वतीने या बेकायदेशीर वाळू उपशाला आळा घालण्यासाठी सातत्याने तहसीलदार कार्यालयाकडे अर्ज व निवेदने देण्यात आली आहेत. विशेषतः सावित्री नदीवरील पूल ढव परिसरात जेसीबीच्या सहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्याचे संघटनेने सांगितले.
तरीदेखील प्रशासनाकडून ठोस कारवाई केली तरि सुध्दा काही वाळू माफिया बेकायदेशीर रित्या वाळू साठा करून नियम धाब्यावर बसवत आहे तरी,शासनाने या मदमस्त वाळू माफियांवर कठोर कारवाई करून बेकायदेशीर वाळू उपसा तात्काळ बंद करावा, अशी मागणी सामान्य नागरिकांसह “आपली माती आपली माणसं” संघटनेच्या वतीने जोर धरू लागली आहे.
दरम्यान, महसूल विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित वाळू साठ्याचा पंचनामा करून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
