रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड, ६ मार्च २०२५ : कार्यस्थळावरील सुरक्षितता आणि परिचालन उत्कृष्टतेप्रती आपली वचनबद्धता अधिक दृढ करत, हायकल लिमिटेडने सुरक्षा मास अभियान सुरू केले आहे. ‘आमची सुरक्षितता, माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित हे अभियान ४ मार्च ते ३१ मार्च २०२५ दरम्यान राबविले जाणार आहे. या अंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाईल, जे व्यक्तिगत जबाबदारीसोबतच एकत्रित सुरक्षितता प्रक्रियांना प्रोत्साहन देतील.
हायकलचा विश्वास आहे की, सुरक्षितता ही सर्व कर्मचाऱ्यांची सामाईक जबाबदारी आहे. या संस्कृतीला अधिक दृढ करण्यासाठी कंपनीने २१ दिवसीय सेफ्टी चॅलेंज सुरू केले आहे. या संरचित कार्यक्रमात कर्मचारी दररोज विविध सुरक्षितता उपक्रमांमध्ये सहभागी होतील, ज्यामध्ये धोक्यांची ओळख, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे (PPE) पालन आणि आपत्कालीन परिस्थितींमध्ये तत्परता यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल. हा उपक्रम कर्मचार्यांना स्वतःच्या, तसेच सहकाऱ्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेण्यास प्रोत्साहन देतो आणि सुरक्षित वर्तन केवळ घटना घडल्यानंतरचा प्रतिसाद नसून, ती एक सवय असली पाहिजे, हा संदेश अधोरेखित करतो.
सुरक्षितता अधिक सोपी आणि आकर्षक करण्याच्या उद्देशाने हायकल ‘सेफ्टी इन माय पॉकेट’ हे उपक्रम सुरू करत आहे. ही एक संक्षिप्त बहुभाषिक पुस्तिका असून, त्यामध्ये महत्त्वाच्या सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे, आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि सुरक्षा प्रशिक्षण व्हिडीओ, तसेच घटना अहवाल साधनांशी जोडणारे QR कोड असतील. या उपक्रमामुळे कर्मचारी नेहमीच महत्त्वपूर्ण सुरक्षा माहिती सहजपणे मिळवू शकतील, ज्यामुळे गंभीर परिस्थितींमध्ये वेगवान आणि सुयोग्य निर्णय घेणे सुलभ होईल.
दृश्यात्मक सुरक्षितता जागृती आणखी बळकट करण्यासाठी, या मोहिमेंतर्गत सुरक्षा वीर, हायकलचा अधिकृत सुरक्षा शुभंकर (मॅस्कॉट), सर्व सुविधा केंद्रांमध्ये प्रदर्शित केला जाईल. सुरक्षा वीर हा कर्मचार्यांना कार्यस्थळी सुरक्षिततेची आठवण करून देणारा प्रतीकात्मक प्रतिनिधी असेल. तो स्टॅंडीज, पोस्टर्स, ई-मेल कम्युनिकेशन आणि डिजिटल स्क्रीनवर झळकणार असून, महत्त्वाचे सुरक्षा संदेश सतत दृढ करण्याचे काम करेल. याशिवाय, सेफ्टी बडी प्रोग्रामअंतर्गत कर्मचार्यांना जोडपे (पेयर्स) करून दिले जाईल, जे एकमेकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेत सहकाऱ्यांना जागरूक ठेवतील. या उपक्रमामुळे प्रत्येक कर्मचारी कार्यस्थळी सुरक्षितता राखण्यासाठी सक्रिय योगदान देईल, अशा प्रकारे एक जबाबदार आणि सुरक्षित कामाचा परिसर निर्माण केला जाईल.
व्यक्तिगत कृतींपलीकडे जाऊन, हायकल संपूर्ण संघटनात्मक स्तरावर नेतृत्वाच्या सहभागाला चालना देणारी सुरक्षितता धोरण राबवत आहे. या अंतर्गत, लीडर्स आणि व्यवस्थापक साइट वॉक, सेफ्टी टॉक्स व मार्गदर्शन सत्रे आयोजित करतील, ज्यातून कंपनीच्या कर्मचारी कल्याण प्राधान्याच्या टॉप-डाऊन वचनबद्धतेचा प्रत्यय येईल. सुरक्षिततेविषयी मुक्त संवादास चालना देऊन, हायकल असे कार्यसंस्कृती विकसित करू इच्छिते, जिथे कर्मचारी निर्धोकपणे धोके नोंदवू शकतील आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी सक्रिय सूचना देऊ शकतील. हा पुढाकार कर्मचार्यांना सुरक्षिततेसाठी सक्षम बनविण्यास मदत करेल आणि एक अधिक जबाबदार कार्यस्थळ निर्माण करेल.
हायकल लिमिटेडचे अध्यक्ष – मानव संसाधन रतिश झा म्हणाले, “सुरक्षितता ही कोणत्याही सक्षम आणि जबाबदार संस्थेचा मूलभूत पाया आहे. आजच्या गतिमान कार्यसंस्कृतीत कंपन्यांनी केवळ नियमांचे पालन न करता, सुरक्षिततेसाठी सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणे गरजेचे आहे. योग्य साधने, ज्ञान आणि सकारात्मक मानसिकता यांच्याद्वारे कर्मचार्यांना सक्षम करून, आम्ही सुरक्षिततेला केवळ एक कॉर्पोरेट निर्देश न मानता, वैयक्तिक जबाबदारी म्हणून स्वीकारण्याच्या दिशेने परिवर्तन घडवू इच्छितो.”
आपल्या दीर्घकालीन वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, हायकल हे सुरक्षा उपक्रम आपल्या सुरक्षा-प्रथम फ्रेमवर्कमध्ये समाविष्ट करत आहे, ज्यामुळे सुरक्षा मास हा सतत सुरक्षितता संस्कृती विकसित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. डिजिटल साधनांचा वापर, प्रशिक्षण सत्रे आणि प्रत्यक्ष उपक्रम यांच्या माध्यमातून, हायकल उद्योगामध्ये सुरक्षिततेच्या उत्कृष्टतेसाठी एक नवा मापदंड प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे.
