रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : खुटील ते गोमेंढी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीने बुद्ध आणि त्याचा धम्म व भारतीय संविधान वाटप नामदार भरत शेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार व भीम गीत गायन स्पर्धा असा तिहेरी कार्यक्रम रावढल जेत्वन बुद्ध विहार येथे सकाळी दहा वाजता मंडळाचे अध्यक्ष दीपक कासारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संगम कासारे यांच्या गीताने करण्यात आली प्रथम लहान गट भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजयजी साळवी भागुराम साळवी मुकुंदराव पाटणे जज पाटणे राजेंद्र पाटणे अनिल जाधव सखाराम जाधव लक्ष्मण जाधव प्रभाकर खांबे योगेश कासारे दीपक मोरे गंगाधर साळवी आदी मान्यवर उपस्थित होते यानंतर मोठा गट भीम गीत गायन स्पर्धेचे आयोजन धुमधडाक्यात करण्यात आले या कार्यक्रमात ज्या ज्या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्टरित्या कामगाज केला आहे त्यांना सन्मानचिन्ह व शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर नामदार भरत शेठ गोगावले यांना मंडळाच्या वतीने शांती प्रतीक बुद्ध मूर्ती व पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यात महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका दिपाली शिंदे व सुदर्शन कासारे यांनी नामदार भरत गोगावले यांच्या बद्दल सुंदर अशी गीते सादर केली नामदार भरत शेठ गोगावले यांच्या हस्ते मुकुंदराव पाटणे विजय साळवी ज ज पाटणे भागुराम साळवी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म व भारताचे संविधान स्थानिक भावकीच्या पदाधिकारी यांच्याकडे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मध्ये विजया साळवी प्रास्ताविक भाषणात नामदार भरत शेठ गोगावले यांची स्तुती करताना म्हणाले की तुम्ही तुम्ही सर्वांचेच नामदार आहात गरिबांचे राजे आहात आमच्या मंडळाला सभागृह देण्याची सुद्धा त्यांनी मागणी केली यानंतर नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात सर्वांना शुभेच्छा दिल्या व मंडळाचा अमृत महोत्सव सुद्धा करू असे सांगितले गोरगरीब जनतेची सेवा करतो म्हणून आलो का आमच्यावर प्रेम करतात विरोधकांनी कितीही टीका केल्या परंतु माझ्या कार्यकर्त्यांनी निवडून आणण्यासाठी खूप मेहनत घेतली असे त्यांनी सांगितले वीरेश्वर महाराज व चवदार तळ्याला मानवंदना देण्याची प्रथा आपण सुरू केली असे ते म्हणाले आपण चार वेल भरघोस मतांनी निवडून येऊ शकलो ते केवळ जनतेच्या प्रेमामुळे असेही त्यांनी नमूद केले तसेच मंडळाला सभागृह बांधून देण्याचे आश्वासन नामदार साहेबांनी दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सचिव प्रफुल्ल साळवी व गंगाधर साळवी यांनी केले.



