रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : रोहिंजन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि पनवेल तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष नंदकुमार म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याने प्रभाग एकमधील रोहिंजन गावलगत विजय पाटील यांच्या घराजवळील व टुडे आनंदम सोसायटी जवळील गटारांची साफसफाई करण्यात आली. यावेळी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, महानगरपालिकेचे कर्मचारी, तसेच सुरेश पोरजी, विजय पाटील, नेहाल ठाकूर, उमेश मढवी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. म्हात्रे यांच्या प्रयत्नांना यश येत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत संबंधित गटारांची साफसफाई केली. यामुळे परिसरातील साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गटारांची स्वच्छता झाल्याने डासांची उत्पत्ती, दुर्गंधी तसेच आरोग्यविषयक समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.याप्रसंगी नंदकुमार म्हात्रे यांनी सांगितले की, “परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध आहोत. नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील.”रोहिंजन परिसरातील स्वच्छता, आरोग्य आणि नागरिकांच्या सोयीसाठी अशा प्रकारच्या कामांना पुढेही प्राधान्य देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
