रायगड लोकधारा वृत्त :
मुलुंड प्रतिनिधी : श्री.सतिश वि.पाटील
हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच वाईट गोष्टींची आहुती देण्याचा आणि रंगाचा सण तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी.’ या सणाचा इतिहास पाहूया. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे ‘होळी.’ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.
होळी सणामागील उद्देश
दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच.
होळीची कहाणी
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रल्हाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रल्हाद घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रल्हाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रल्हादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले,मुलुंड नाहूरगावठाणातील होळीनिमित्त एक आधी वेशभूषा (सोंग) नवरानवरी गावातून काढली जाते यावेळी हिरादेवी ब्राॅस बॅन्ड व परेश डेकोरेटर, कै.शंकर नामाजी पाटील मंडळ, सर्व गावातील लहान मोठे हौसेने व उत्साहाने सहभाग घेतात पुर्वी आट्यापाट्या व फेऱ्यांची गाणी पण घेत आता लुप्त होत आहे आता महीलासाठी संगितखुर्ची ,लकी ड्राॅ,वेशभूषा बक्षीस असे कार्यक्रम होतात होळीचा मानपान पारंपारिक गावाच्या पाटीलांकडे असतो एक गाव एक होळी असा भरगच्च कार्यक्रम असतो सर्व मंडळे एकत्र येऊन मदत करतात यावेळी मुलुंड पोलिसांचे ही अनमोल सहकार्य लाभते ! सर्वांना होळी ,सिमगा,धूलिवंदनांच्या शुभेच्छा!
“आनंदी रहा आनंदात सण साजरा करूया” !



