रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : इंटिग्रेटेड सोशल वेल्फेअर सोसायटी (रजि) बेळगावी व नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन (रजि) बेळगावी तर्फे दिल्ली,गुजरात,गोवा,कर्नाटक, महाराष्ट्र राज्यातून निवडक व्यक्तींमधून दिला जाणारा यावर्षीचा ‘राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक गौरव पुरस्कार-२०२५’ न्यू इंग्लिश स्कूल वलंग विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक मा.श्री राजन महादेव कुर्डुनकर सर यांना गोवा साखळी येथे दि.२७/४/२०२५ रोजी संपन्न झालेल्या भव्य दर्जेदार सोहळ्यात मा विरप्पा मोईली- मा.केंद्रीय कायदा मंत्री,भारत सरकार दिल्ली,श्रीम.रत्नमाला सावनूर,मा केंद्रीय मंत्री-भारत सरकार दिल्ली,बॅ.अमरसिंह पाटील,मा खासदार या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्था अध्यक्ष श्री अनंत रेवाळे,उपाध्यक्ष श्री दिलीप साळवी,माजी कार्यवाह श्री प्रभाकर सागवेकर, खजिनदार श्री रामदास धाडवे, सदस्य व शिक्षक श्री गंगाधर साळवी तसेच पालक विद्यार्थी व समाजाच्या विविध स्तरातून श्री कुर्डुनकर सर यांचे अभिनंदन होत आहे. श्री कुर्डुनकर सर हे विद्यालयात १९९१ पासून सेवेत असून २०१८ पासून मुख्याध्यापक म्हणून सेवारत आहेत. विविध सांस्कृतिक उपक्रम,शाळेचा १००℅ निकाल,भौतिक सुविधा,स्पर्धा परीक्षा,स्वछ व सुंदर शाळा स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम या माध्यमातून शाळा नावलौकिकास आली आहे. मुख्याध्यापक म्हणून त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. दिनांक २८ एप्रिल २०२४ रोजी को.म.सा.प.जिल्हा समन्वयक श्री अ वि जंगम सर,कार्यकारी मंडळ सदस्य प्रभाकर सागवेकर,सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री गंगाधर साळवी,शिक्षिका मीनाक्षी राऊत,लेखनिक श्री बर्वे एस एस,श्री मोरे सी एस,गायकवाड एस के व विद्यार्थी यांचे मार्फत त्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. सदर पुरस्कार संस्था अध्यक्ष,पदाधिकारी,सर्व सदस्य, विद्यालयाचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी,संस्थापक कै.महादेव धोंडू कुर्डुनकर गुरुजी,प्रथम अध्यक्ष कै.ह भ प लक्ष्मण पांडुरंग बर्वे यांना समर्पित करीत आहे,असे सत्कारमूर्ती श्री कुर्डुनकर सर म्हणाले.
