रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : तालुक्यातील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना स्वराज्य फिल्म प्रोडक्शन संघटना महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे पत्र देण्यात आले आहे हा कार्यक्रम पुणे पिंपरी चिंचवड येथे 10 मे 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता आचार्य अत्रे सभागृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार असून यामध्ये महाड येथील निर्भीड पत्रकार नितेश लोखंडे यांना सुद्धा पुरस्कार जाहीर झाल्याचे कळविण्यात आले आहे नितेश लोखंडे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल महाड तालुक्यात त्यांचे सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे नितेश लोखंडे यांनी पत्रकार क्षेत्रात आपले स्वतःचे असे मजबूत स्थान निर्माण केल्याबद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आहे पुरस्कार मिळाल्याबद्दल खाडी पट्ट्यातील सुद्धा सर्व संघटना व राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे पत्रकार नितेश लोखंडे यांना राज्यस्तरीय कामगार कला गौरव पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
