⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
महाड प्रतिनिधी: 26 जून 2025 सामाजिक न्याय विभाग मार्फत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण रायगड अलिबाग यांचे अधिनस्त महाड तालुक्यातील मागासवर्गीय मुलांचे मुलींचे शासकीय वसतिगृह येथे सामाजिक न्याय दिनानिमित्त छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी करण्यात आली मुलांचे शासकीय वसतिगृह महाड येथे श्री अनिल मोरे गृहपाल यांच्या समवेत पत्रकार निलेश लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले तसेच मुलींचे शासकीय वसतीगृह महाड येथे श्रीमती कुंदागिरी प्रभारी गृहपाल यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पूजन करून अभिवादन करण्यात आले दोन्ही वसतीगृहात भारताचे संविधान प्रास्ताविक उपस्थित समवेत वाचन करण्यात आले. मुलींचे शासकीय वसतीगृह महाड ते मुलांचे शासकीय वसतिगृह महाड पर्यंत रॅली काढण्यात आली सदर रॅलीत मुले मुली समवेत कर्मचारी व बाह्य स्त्रोत कर्मचारी यांनी सहभाग घेतला मुलांचे शासकीय वस्तीगृह महाड येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनपटावर आधारित विद्यार्थ्यांच्या भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत कुमार पवन दामा बी.टेक. कुमारी भगवती थोरात टी.वाय. बी.टेक कुमार धम्मदीप गोडबोले बी टेक यांना प्रथम,दुतीय, तृतीय क्रमांक देण्यात आले असून कुमार प्रणव गायकवाड टी वाय बी ए यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले सदर सामाजिक न्याय दिनानिमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. अनिल मोरे गृहपाल मुलांचे शासकीय वस्तीगगृह महाड यांनी केले. पत्रकार निलेश लोखंडे प्रमुख उपस्थितीत यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकालात ते सामाजिक न्याय प्रस्थापनेसाठी सदैव दक्ष होते दुर्बल घटकांसाठी त्यांनी विशेष सहानुभूती होती असे सांगून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाची सांगता श्रीमती कुंदा गिरी प्र.गृहपाल यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.



