रायगड लोकधारा वृत्त / विजय गायकर
रायगड लोकधारा प्रतिनिधी / मुंबई : ता. १८ : आंतरराष्ट्रीय कामगार नेते व रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी फोटोग्राफीची विशेष आवड असल्याने मुंबई येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे तीन दिवस चाललेल्या Consumer Electronic Imaging Fair 2026 या भव्य प्रदर्शनाला भेट दिली.
या प्रदर्शनात फोटोग्राफी व व्हिडिओग्राफी क्षेत्रात नव्याने आलेले अत्याधुनिक कॅमेरे, लेन्स, लाईटिंग सिस्टीम्स तसेच इमेजिंग क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान यांची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. बदलत्या काळात फोटोग्राफी हे क्षेत्र झपाट्याने विकसित होत असून, नवीन तंत्रज्ञान फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर मित्रांनी आत्मसात करावे आणि स्वतःला सतत अपडेट ठेवावे, असे आवाहनही महेंद्रशेठ घरत यांनी यावेळी केले.

यावेळी त्यांच्या सोबत ज्येष्ठ व्हिडिओ तज्ञ सुमंत नलावडे, फोटोग्राफर लक्ष्मण ठाकूर, पत्रकार कृष्णा पाटील तसेच स्वीयसायक ओम देशमुख उपस्थित होते. उपस्थितांनीही प्रदर्शनातील नव्या तंत्रज्ञानाबाबत चर्चा करत अनुभव व्यक्त केले.
फोटोग्राफी आणि व्हिडिओ क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी असे प्रदर्शन मार्गदर्शक ठरत असून, नव्या पिढीसाठी हे तंत्रज्ञान प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
