रायगड लोकधारा वृत्त / विजय गायकर
पनवेल, ता. २० (प्रतिनिधी : अशोक घरत) : पळस्पे जिल्हा परिषद ४ या गटातून भारतीय जनता पार्टीच्या वतीने सौ. हर्षदा अतुल घरत यांची जिल्हा परिषद सदस्य पदासाठी अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपा पक्ष संघटनेने त्यांच्यावर विश्वास टाकत युवा व महिला नेतृत्वाला संधी दिली आहे.
उद्या सौ. हर्षदा अतुल घरत आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल करणार असून, यावेळी पळस्पे जिल्हा परिषद ४ या गटातील मतदार बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, भाजपा नेतृत्व,पदाधिकारी तसेच ग्रामस्थांकडून सौ. हर्षदा घरत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अतुल मारुती घरत व त्यांची पत्नी सौ. हर्षदा घरत या दोघांचाही सामाजिक कार्याचा अनुभव, लोकांशी असलेला थेट संपर्क आणि विकासाभिमुख दृष्टिकोन लक्षात घेता त्या या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रभावी उमेदवार ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांनी आपला आशीर्वाद व शुभेच्छा देत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सौ. हर्षदा अतुल घरत यांनी अतुल घरत यांच्या सहचारिणीच्या नात्याने तसेच उमेदवार म्हणून केले आहे.
