रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल / केवल महाडिक : नवी मुंबई पोलीस दलातील ‘शिस्तबद्ध अधिकारी’ अशी ओळख असलेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या कार्यतत्परतेमुळे पनवेल शहरामधील वाहतूक कोंडी दूर होण्यास प्रयत्न होत असून वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी अनेक हिताचे कार्यक्रम औदुंबर पाटील यांनी हाती घेतले आहेत. औदुंबर पाटील यांचा पोलीस दलातील रुबाबदारपणा अनेकांना परिचित असून औदुंबर पाटील हे नवी मुंबई पोलीस दलातील एक वरिष्ठ पोलीस निरीक्षक असून, त्यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते सक्रिय आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी कामगिरीबद्दल ओळखले जातात. सध्या त्यांनी पनवेल शहर वाहतूक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात नवी मुंबई विमानतळजवळील रस्ते वाहतूक कोंडी, पनवेल शहरातील पार्किंग समस्या, प्रकल्पग्रस्थांना रिक्षा स्टॅन्ड उपलब्ध करून देणे, वाहतूक नियमनांबाबत जनजागृती करणे यासारखे काम करत असल्याने वाहतूक शाखेचा आलेख उंचावत चालला आहे. महानगरपालिकेच्या आडमुठेपणामुळे पनवेल शहर आणि वाहतूक कोंडी हे समीकरण जरी असले तरी महापालिका व इतर प्रशासनाशी संपर्क साधून औदुंबर पाटील यांनी पनवेलकर व प्रशासन यांच्यात समन्वय साधला आहे. पनवेल बस स्थानक परिसरात महामार्गाखाली देखील औदुंबर पाटील यांचे विशेष लक्ष असून त्यांनी स्थानिक नागरिकांना विशेषतः तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध व प्रवाशांना देखील मुंबई पुणे – खोपोली येथे जाण्यासाठी गाड्या लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी कोणालाही त्रास न होता विशेष टॅक्सी आणि रिक्षास्टॅन्ड उपलब्ध केले असून यामुळे तेथिल नागरिकांनी औदुंबर पाटील यांचे आभारही मानले. अनेक ठिकाणी कारवाई करताना वाहतूक पोलिसांना अनेकांच्या त्रासाला सामोरे जावे लागते कधीकधी कारवाईत दुजाभाव करीत असल्याचा आरोपही अनेक त्रस्त लोक करीत असतात मात्र औदुंबर पाटील व पूर्ण पनवेल शहर वाहतूक शाखा हे आजही उन्हाचा पारा चढत असताना अनेक ठिकाणी आपले कर्तव्य बजावत असताना दिसून येतात अर्थातच याचे श्रेय हे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनाच जाते.
