रायगड लोकधारा वृत्तसेवा :
७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ खाटांचे रुग्णालय पनवेलकरांसाठी उभारा – पनवेलकरांची लोकनेते रामशेठ ठाकूरांना आर्त हाक ! पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाकडे पत्राद्वारे मागणी…

पनवेल / केवल महाडिक : लोकनेते रामशेठ ठाकूर हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय माजी खासदार, थोर समाजसेवक आणि दानशूर व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांना अनेकदा ‘शिक्षण महर्षी’ किंवा ‘दानशेठ’ म्हणूनही ओळखले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, लोकसेवा आणि समाजकारणासाठी समर्पित केले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील मोठे योगदानरयत शिक्षण संस्था: ते या प्रसिद्ध संस्थेचे माजी विद्यार्थी आणि व्यवस्थापकीय परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी या संस्थेला कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. त्यांनी शिक्षण संस्थेसाठी शासनाकडून माफक दरात अनेक भूखंड घेतले असून त्याठिकाणी त्यांनी टोलेजंग शाळा कॉलेज उभारले आहेत. काहींना मोफत शिक्षण देत असल्याचा गाजावाजा जरी त्यांचे हितचिंतक करत असले तरी अनेक लोकांकडून वार्षिक फी आकारणी करूनच शाळेचा कारभार चालतो. यामध्ये फायदा आहे तो फक्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांचाच. सुज्ञ नागरिकांनी नाव न छापण्याच्या अटीवरून दिलेल्या माहितीनुसार एकतर शाळेसाठी माफक दरात भूखंड मिळतो त्यानंतर शाळेत असलेले सर्व कर्मचारी हे निवडणुकीच्या दरम्यान काम करण्यासाठी देखील महत्वाचे ठरतात तसेच जे विद्यार्थी त्यांच्या शाळेत शिक्षण घेतात व ज्यांना शेठच्या सहीने ऍडमिशन मिळते असे पालक देखील मतदानावेळी मतदान करून आपले कर्तव्य पार पाडतात, त्यामुळे पूर्ण फायदा हा दानशूर नेते रामशेठ ठाकूर यांचाच होत असल्याने आता शिक्षण क्षेत्रात शेठ असलेले रामशेठ पनवेलकरांचे उपकार आरोग्य संस्थांना मदत करून कसे फेडतात याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. पनवेलच्या तमाम जनतेला एक सुसज्ज असे मोफत रुग्णालय उपचारासाठी असणे गरजेचे आहे. तशा प्रकारच्या अनेक मागण्या सामाजिक संस्थांनी केल्या आहेत. सध्या असलेले डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात अनेक सोइ सुविधांचा अभाव आहे. रुग्णाला गोळ्या औषध देखील बाहेरून घ्यावी लागत असून मयत झाल्यानंतर कफन घेण्यासाठी देखील ५०० रुपये कपड्याचे द्यावे लागतात. तसेच पनवेलमधील खाजगी हॉस्पिटल हे लुटारू बनले असल्याने नागरिकांची लूट होऊन असून अनेकदा उपचाराअभावी रुग्ण दगावतोहि. नुकतेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा अमृतमहोत्सवी वर्ष असून ७५ वा वाढदिवस ते साजरा करणार आहेत. त्यांच्या या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पनवेलमध्ये ७५ खाटांचे मोफत उपचार करण्यात येणारे रुग्णालय उभारावे अशी मागणी रुग्णालयांचे बिल भरून हतबल झालेले नागरिक करीत आहे. आता शिक्षण क्षेत्रात शेठ असणारे रामशेठ ठाकूर हे आरोग्य क्षेत्रात देखील शेठ बनणार कि नेहमीप्रमाणे टोलवाटोलवी करून यातही लेट होणार हे पाहणे उचित ठरेल.
शाळांची उभारणी :
ग्रामीण आणि गरीब विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालये सुरू केली. त्यांच्या नावाने पनवेल आणि कामोठे भागात, उलवे येथे लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल चालवले जाते. आपल्या पत्नीसह रयत शिक्षण संस्थेला तब्बल १०० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. कमाईसाठी नव्हे त्यांनी शिक्षणाचा व्यापार न करता ते सेवा म्हणून अगदी माफक दरात उपलब्ध करून दिले आहे. राजकीय आणि सामाजिक प्रवासमाजी खासदार: ते रायगड (पूर्वीचा कोलाबा) लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते.कष्टाळू जीवन: त्यांनी ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत स्वतःचे शिक्षण पूर्ण केले आणि काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले.मदतीचा हात: कोरोना टाळेबंदी (Lockdown) सारख्या संकटाच्या काळात त्यांनी गरजू लोकांना खूप मोठी मदत केली होती. त्यांच्या याच अफाट आणि निस्वार्थी शैक्षणिक कार्यामुळे त्यांना ‘जीवनगौरव पुरस्काराने’ देखील सन्मानित करण्यात आले आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आजपर्यंत रयत शिक्षण संस्थेला १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त देणगी दिली आहे. त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांना ‘रयत’चे आधुनिक एकलव्य म्हणून गौरविण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने (९ मे) दरवर्षी ते संस्थेला कोट्यवधी रुपयांची देणगी देतात.
नुकतेच दिलेले योगदान: अलीकडच्या काही वर्षांत त्यांनी ठाकूर कुटुंबियांच्या वतीने संस्थेला ३.६२ कोटी आणि ७.११ कोटी रुपयांची देणगी देऊन भौतिक व शैक्षणिक सुविधांसाठी भरीव हातभार लावला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर हे स्वतः ‘रयत’चे माजी विद्यार्थी असून त्यांनी या संस्थेमध्ये शिक्षक म्हणूनही सेवा केली आहे. तसेच उलवे येथे त्यांनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील बनवले असून त्याठिकाणी अनेक क्रीडा क्षेत्रातील मान्यवर हजेरी लावत असतात त्यामुळे शिक्षण संस्था आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बांधण्यासाठी इतके कष्ट घेतले जात असतील तर लोकसेवेसाठी रुग्णालय बांधणे मोठी गोष्ट नाही त्यामुळे लवकरच रुग्णालयाची मागणी रामशेठ पूर्ण करतील असा विश्वास पनवेलकरांना आहे.
लोकनेते रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळामार्फत पनवेलमध्ये ‘सुतिका गृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ (Sutika Gruha Multispeciality Hospital) हे रुग्णालय सुरू करण्यात आले आहे. हे रुग्णालय सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहे. सुविधेअंतर्गत सर्वसामान्य प्रसूतीसाठी फक्त ₹१५,००० आणि सिझेरियन प्रसूतीसाठी ₹३०,००० इतके माफक शुल्क आकारले जाते. या रुग्णालयात प्रसूतीसोबतच इतर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय सेवा देखील उपलब्ध आहेत. तसेच, या संस्थेमार्फत वेळोवेळी मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन देखील केले जाते. मात्र लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक रुग्णालय नावाचे कोठेही रुग्णालय नाही त्यामुळे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पनवेलकरांसाठी ७५ खतांचे अद्ययावत रुग्णालय बांधून ते जनसेवेत द्यावे अशी मागणी पत्रकार मित्र असोसिएशनने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांना लेखी पत्र मेल करून केली आहे.
या मागणीमागील मुख्य कारणे :
आरोग्य सुविधांची गरज: पनवेल आणि आसपासचा परिसर झपाट्याने वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या मानाने सर्वसामान्य आणि गरीब रुग्णांना परवडणाऱ्या दरात दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळणे कठीण झाले आहे.
अपघातांचे प्रमाण: पनवेल हा मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, सायन-पनवेल हायवे आणि गोवा हायवेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. या भागात होणाऱ्या अपघातांमधील रुग्णांना तात्काळ ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळण्यासाठी एका सुसज्ज रुग्णालयाची नितांत गरज आहे.
रामशेठ ठाकूर यांच्यावरील अथांग विश्वास: रामशेठ ठाकूर यांनी आजवर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवली. त्यांनी उभारलेली शैक्षणिक संकुले आज हजारो विद्यार्थ्यांना घडवत आहेत. त्यामुळे “शिक्षण क्षेत्रानंतर आता रामशेठ ठाकूर यांनी आरोग्य क्षेत्रातही क्रांती करावी,” अशी जनतेची प्रामाणिक इच्छा आहे.
जनतेची भावना काय आहे ?
“रामशेठ ठाकूर यांनी आजवर अनेक सामाजिक उपक्रम, मोफत वैद्यकीय शिबिरे आणि मदतीचे हात देऊन हजारो लोकांचे प्राण वाचवले आहेत. पण जर त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक हक्काचे, ७५ खाटांचे अद्ययावत रुग्णालय उभे राहिले, तर ती पनवेल आणि उरणमधील जनतेसाठी सर्वात मोठी भेट ठरेल. वाढदिवसाच्या मोठ्या सोहळ्यांपेक्षा हे रुग्णालय येणाऱ्या पिढ्यांसाठी जीवनदायी ठरेल.”
— पनवेलकर नागरिक
