Blog

रायगड लोकधारा वृत्तसेवा :

रायगड लोकधारा प्रतिनिधी / कर्जत : कर्जतमधील पत्रकार जयेश जाधव यांना बिल्डर दिनेश तिवारी व त्याचे दोन साथीदाराने शिवीगाळ व धक्काबुक्की करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ रायगड यांनी जाहीर निषेध व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्रकार जयेश जाधव यांनी भिसेगाव फातिमा चर्चमागे प्रथमेश डेव्हलपर्सच्या इमारतीच्या बेकायदेशीर बांधकामाविरोधात विविध वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध केल्याचा राग व कर्जत नगरपरिषद, कर्जत पोलीस ठाणे, पोलीस अधीक्षक रायगड यांचेकडे केलेल्या लेखी तक्रारीचा राग मनात धरून जाधव यांना धक्काबुक्की करून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून आरोपी दिनेश रामनारायण तिवारी, चंद्रभुवन शुक्ला, प्रिन्सकुमार मुखीया यांचे विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीसांनी या तक्रारीवरून कर्जत पोलीस ठाणे गु.र १०२/२०२६ बी एन एस चे कलम ११५(२) ३५२, ३५१ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक प्रवीण भालेराव हे करीत आहे.