रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण : रमाकांत घरत आयोजित “आदर्श ट्रॉफी २०२६” येसूआई ग्रुपच्या सहकार्याने भव्यदिव्य नाईट अंडरआर्म क्रिकेट सामने खारपाडा गावात ब्रिजजवळ मोठ्या उत्साहात व जल्लोषात संपन्न झाले. या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे या स्पर्धेतून मिळणारे संपूर्ण उत्पन्न अनाथ आश्रमातील विद्यार्थ्यांच्या शालेय शिक्षणासाठी दान करण्यात येणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या कार्यक्रमाचे उद्घाटक आवाज महामुंबईचा न्यूज चॅनलचे संपादक सन्मानिय मिलिंद खारपाटील साहेब यांच्या यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून
ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, इंचगिरी संप्रदायाचे कोकण विभाग सचिव कृष्णा वर्तक सर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रायगड लोकधारा न्यूज चॅनलचे संपादक विजय गायकर साहेब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, प्रवीण ठाकूर, प्रवीण घरत, सुनील जोशी यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राजमाता जिजाऊ माँ साहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. खेळपट्टीचे पूजन सामाजिक कार्यकर्ते सचिन गावंड यांच्या हस्ते पुष्पहार घालून श्रीफळ वाढवून करण्यात आले. उपस्थित मान्यवरांना शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अष्टगंध सामाजिक कला मंडळाचे अध्यक्ष अशोक म्हात्रे साहेब, २७१ आगरी कोळी नाट्य प्रयोग पूर्ण करणारे सर्वांचे लाडके नाट्यकलाकार श्री दिगंबर कोळी साहेब, नाट्यकलाकार अलंकार कडू, राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे रायगड जिल्हा संघटक सुनील जोशी, पोलीस मित्र समितीचे पनवेल तालुका अध्यक्ष गणेश जाधव, माजी उपसरपंच संजय घरत, सामाजिक कार्यकर्ते अरुण गावंड(आवरे), राजेश गोंधळी(कांबे), नरेश नामदेव झेमसे(जिते), तंटामुक्त गाव समिती दुष्मी-खारपाडा अध्यक्ष श्री हनुमान घरत आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडण्यासाठी देणगी रूपाने, वस्तु रूपाने शिवसेना शाखाप्रमुख उद्योजक गजानन घरत, उद्योजक महेंद्र घरत, ग्रामपंचायत सदस्य हिरामण घरत, कैलास रुठे पेण तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, माजी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत घरत, सामाजिक कार्यकर्ते रणजीत पाटील, प्रवीण ठाकूर, उद्योजक प्रवीण घरत, साहिल कोळी, योगेश मोकल येसूआई ग्रुपचे सर्व सन्माननीय सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या स्पर्धेत एकूण २४ संघानी सहभाग घेतला होता. प्रथम क्रमांक-आर के स्पोर्ट्स खोपोली, द्वितीय क्रमांक-महाडिक वाडी पेण, तुतीय क्रमांक-विष्णुकांता जिते या संघानी पटकाविला.
अनुक्रमे प्रथम क्रमांक भव्य ट्रॉफी व रोख रक्कम ₹३०,०००/-
द्वितीय क्रमांक भव्य ट्रॉफी व रोख रक्कम ₹१५,०००/-
तृतीय क्रमांक भव्य ट्रॉफी व रोख रक्कम ₹८०००/-
या क्रिकेट सामन्यात मालिकावीर-रहीम(आर के स्पोर्ट्स-खोपोली), उत्कृष्ट फलंदाज-मयूर (विष्णुकांता-जिते), उत्कृष्ट गोलंदाज-अजय(विष्णुकांता-जिते), उत्कृष्ट क्षेत्ररक्षक-नईम(आर के स्पोर्ट्स-खोपोली),उत्कृष्ट झेल- अखिल(आर के स्पोर्ट्स खोपोली)
स्पर्धेसाठी पंच म्हणून योगेश मोकल, कैलास रुठे, राकेश घरत
यांनी काम पाहिले तसेच गुणलेखक म्हणून रवी भोईर यांनी अतिशय सुरेख भूमिका बजावली. या क्रिकेट सामन्यात समालोचक म्हणून ॲड बबनदादा घरत, नितेश घरत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.बबनदादा घरत यांनी केले.
व्यवस्थापक ग्रामस्थ मंडळ खारपाडा सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने ही क्रिकेट स्पर्धा अतिशय जल्लोषात साजरी झाली.
या कार्यक्रमाची रूपरेषा, नियोजन आणि स्वागतोच्छुक
म्हणून पुरोगामी पत्रकार संघ भारत रायगड जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार कैलासराजे घरत यांचे अतिशय महत्वपूर्ण योगदान लाभले.
या स्पर्धांचे मुख्य आयोजक रमाकांत घरत यांच्या स्तुत्य उपक्रमाबद्दल खारपाडा पेण परिसरातील ग्रामस्थ युवा वर्गाकडून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे.
