रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत रायगड जिल्हा प्रतिनिधी : स्वतंत्र कोकणराज्याच्या मागणीसाठी कार्यरत असलेल्या स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या जनसंपर्क विभागात विविध मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती अभियानाचे संस्थापक श्री. संजय कोकरे यांनी दिली. जनसंपर्क प्रमुख पदावर पुढील मान्यवरांची निवड करण्यात आली आहे. जनसंपर्क प्रमुख :
१) श्री.मुरलीधर करंगुटकर
२) श्री.बापु परब
३) सौ.साधनाताई ठाकूर
४) श्री.विशाल बांदवलकर
५) श्री.प्रदीप मयेकर
६) श्री.विजयकुमार लिंगायत
सदर नियुक्तीमुळे स्वतंत्र कोकणराज्य अभियान अधिक व्यापक पातळीवर जनतेपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून कोकणातील विकास, हक्क आणि जनतेच्या प्रश्नांसाठी अभियान अधिक ताकदीने कार्य करणार असल्याचे संस्थापक श्री. संजय कोकरे यांनी सांगितले.
नियुक्त सर्व मान्यवरांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
