रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत खारपाडा पेण : श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांच्या माध्यमातून सन्माननीय ओमप्रकाश परांजपे सर यांच्या मार्गदर्शनाखाली
“अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” स्वामी समर्थ परिवार व युवा फ्रेंड्स सर्कल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने खैरासवाडी अंगणवाडी, निफाडवाडी अंगणवाडी, रा.जि.प.निफाडवाडी शाळेतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब मुलींना सायकल वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि नियोजक : महात्मा ज्योतिबा फुले नॅशनल फेलोशिप पुरस्कार विजेते सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत. खैरासवाडी अंगणवाडी स्कूल किट वाटप कार्यक्रम : खैरासवाडी अंगणवाडीमधील मुलांना 10 स्कूल बॅग किट वाटप करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका सौ.अरुणा गावडे, दुष्मी -खारपाडा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र कातकरी, ग्रामस्थ महिला विद्यार्थी उपस्थित होते. रायगड लोकधारा न्यूज चॅनलचे संपादक सन्मानिय विजय गायकर साहेब, महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत आणि “अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” स्वामी समर्थ परिवार सदस्य यांच्या हस्ते अंगणवाडीतील 10 विद्यार्थ्यांना स्कूल बॅग किट वाटप करण्यात आले.
निफाडवाडी अंगणवाडी खेळणी, रेनकोट, शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम : निफाडवाडी अंगणवाडीतील मुलांसाठी शैक्षणिक साहित्य 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट देण्यात, खेळणी, मूल्यांक पुस्तके, एबीसीडी पाट्या, बाहुल्या व 30 रेनकोट वाटप, खाऊ वाटप करण्यात आला.
*सायकल वाटप कार्यक्रम: निफाडवाडीतील 1)कु.ज्योती गणेश दरवडा 2)कु.करुणा प्रमोद लेंडे 3)कु. मंजुळा विठोबा पारधी या गरीब गरजू मुलींना सायकल वाटप करण्यात आल्या.
स्वामीं समर्थांची आरती आणि स्वागत समारंभ : उपस्थित पाहुण्यांचे या ठिकाणी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर स्वामी समर्थांची आरती घेण्यात आली. आरती घेतल्यानंतर आणलेल्या सर्व वस्तूंचे पाहुण्यांचे हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले.
निफाडवाडी शाळेसाठी प्रिंटर, शैक्षणिक साहित्य वाटप :
निफाडवाडी शाळेसाठी प्रिंटर देण्यात आला. शैक्षणिक साहित्य 30 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 वह्यांचा एक सेट देण्यात, 30 रेनकोट वाटप करण्यात आले.
प्रमुख सन्माननीय अतिथी आणि मान्यवर : या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड लोकधारा न्यूजचे संपादक पत्रकार श्री विजयजी गायकर सर, सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत, “अ ग्लिम्पस ऑफ डीव्हीनिटी” स्वामी समर्थ परिवार सर्व सन्मानीय सदस्य राजू रजनी, किरण पुजारी, व्यवस्थापक प्रदीप मोहिते, सामाजिक कार्यकर्ते नितेश पाटील, सामाजिक कार्यकर्त्या रोहिणी ठाकूर, तंटामुक्ती अध्यक्ष बामा रामा पारधी तसेच निफाडवाडीचे सर्व ग्रामस्थ, महिला, तरुण वर्ग, पालक वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदिवासी मुलांच्या उत्कर्षासाठी शैक्षणिक प्रगतीसाठी स्तुत्य उपक्रम : या स्तुत्य उपक्रमामुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झाला होता. या स्तुत्य उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत यांचे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, विकासासाठी मोठे योगदान : आपले मनोगत व्यक्त करताना सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे घरत म्हणाले की आमच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी या शैक्षणिक साहित्याची नक्कीच मदत होईल, आदिवासी मुले सुशिक्षित झाली पाहिजेत, व्यसनमुक्ती, बालविवाह प्रतिबंध, नशामुक्ती साठी आपण सदैव प्रयत्नशील असून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत, मूलभूत सुख सोयींपासून आदिवासी समाज नेहमीच दुर्लक्षित आहे. त्यांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी आपण सतत प्रयत्न करत आहोत.
उत्तम सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन : या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन निफाडवाडी शाळेचे मुख्याध्यापक अजय पाटील सर यांनी केले होते. हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पाडण्यासाठी शिक्षक निलेश रामदास कोळी, निफाडवाडी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.सर्वांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी रीतीने पार पडला. सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त करून या कार्यक्रमाची गोड सांगता झाली.
