रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / खारपाडा पेण : पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड,धडाकेबाज, निडर, परखड आणि उत्कृष्ट कार्य कर्तृत्वावर संपूर्ण महाराष्ट्रभर आपला ठसा उमटवणारे कर्तव्यनिष्ठ पत्रकार तथा दैनिक वीर शिरोमणीचे मुख्य संपादक तथा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकरसिंह ठाकूर यांना त्यांच्या पत्रकारिता या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जागतिक आरोग्य दिना आचार्य नरेंद्र देव संस्था यांच्या वतीने “महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२६”
७ एप्रिल २०२६ रोजी प्रदान करण्यात आला आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे. संपादक शंकरसिंह ठाकूर हे नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील मौजे पांगरा येथील ग्रामीण भागातील एक सामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व असून त्यांनी श्री.शिवाजी कॉलेज, कंधार येथून एम. ए.पर्यंत उच्च शिक्षण घेतलेले आहे. त्यांनी पत्रकारीता क्षेत्रात अल्पावधीतच आपल्या कार्यकर्तृत्वाच्या जोरावर नावलौकिक मिळविला आहे. एका साप्ताहिक वृत्तपत्रातून काम सुरु करून अनेक दैनिकात त्यांनी आपल्या लिखाणाद्वारे अनेक शोध बातम्या लिहिल्या आणि ते आता दैनिक वीर शिरोमणी या वर्तमानपत्राचे मुख्य संपादक आहेत. तसेच त्यांनी यापूर्वी अनेक वर्तमान पत्रात शहर प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी, सहसंपादक, उपसंपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.अनेक वर्तमानपत्रात त्यांनी शोध बातम्या व समाज हिताच्या बातम्या लाऊन सामान्य जनतेच्या मागण्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या त्या मुळे ते निर्भीड पत्रकार म्हणून नावारूपास आले.त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून यापूर्वी पण त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेआहे. त्यांना हा “महाराष्ट्र भूषण सामाजिक कार्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२६” प्रदान करण्यात आल्याबद्दल नांदेड जिल्हाभरातून तसेच संपूर्ण महाराष्ट्रभरातील मित्रपरिवाकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार विजेते पत्रकार कैलासराजे घरत यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा दिल्या.
