Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :

या निवड चाचणीतून निवडलेला संघ 16 वर्षाखालील गटातील औरंगाबाद येथे होणार्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बास्केटबॉल अजिंक्यस्पर्धेत रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करेल.
रायगड जिल्ह्यातील सर्व बास्केटबॉल खेळाडूंना या निवड चाचणीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. खेळाडूंनी निवड चाचणीसाठी येताना दोन पासपोर्ट आकाराचे फोटो , वयाचा पुरावा आणि निवासाचा पुरावा (आधार कार्ड किंवा समकक्ष कागदपत्र) सोबत आणणे बंधनकारक आहे.
“आजच्या युवकांमध्ये अपार क्षमता आहे, फक्त योग्य व्यासपीठाची गरज आहे. खारघर येथे आयोजित करण्यात आलेली ही जिल्हास्तरीय बास्केटबॉल निवड चाचणी रायगडमधील युवा खेळाडूंसाठी स्वप्नांना नवी दिशा देणारी ठरणार आहे. 16 वर्षांखालील मुला-मुलींनी या संधीचा लाभ घेत आपल्या मेहनत, जिद्द आणि कौशल्याच्या जोरावर राज्यस्तरावर झेप घ्यावी. मैदानावर उतरून स्वतःला सिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे,” असे आवाहन आमदार विक्रांत दादा पाटील, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना तथा अध्यक्ष, बास्केटबॉल असोसिएशन ऑफ रायगड यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी खेळाडूंनी सचिव नईम चिकटे 9773913434, मंदार म्हात्रे (+91 88508 00299) व आकाश चाकणे (संपर्क: ९०२९५९६९४९) यांच्याशी संपर्क साधावा.
