Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पुणे : पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तंबाखूच्या जुन्या वादातून दोन कैद्यांनी मिळून एका सहकैद्यावर हल्ला करत त्याचे डोके फोडल्याची माहिती समोर आली आहे. ⚠️
मिळालेल्या माहितीनुसार, न्यायालयीन कोठडीत असलेला कैदी शुभम पंढरीनाथ पोखरकर हा शौचालयाकडे जात असताना आरोपी कैदी अजय राठोड आणि संतोष भालेराव यांनी त्याला अडवलं. जुन्या वादावरून दोघांनी त्याच्याशी वाद घालत अचानक हल्ला केला. 😠
एका आरोपीने जेवण वाटपासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी/स्टीलच्या मापट्याने शुभमच्या डोक्यावर वार केला, तर दुसऱ्याने प्लास्टिकची बादली डोक्यात मारली. या हल्ल्यात शुभम गंभीर जखमी झाला असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. 🩸💥
या घटनेनंतर कारागृहातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तुरुंगाधिकारी रेवननाथ कानडे यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 👮♂️
कारागृहातच अशा हिंसक घटना घडत असल्याने सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 🤔
