⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त २८ मे २०२५ रोजी पनवेलमधील भारतीय जनता पार्टीच्या प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मा. नगराध्यक्ष श्री. जे. एम. म्हात्रे यांच्या हस्ते सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या प्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते. माझ्यासोबत मा. नगरसेवक श्री. गणेश कडू, श्री. सुनील बहिरा, श्री. विजय भोईर, सौ. प्रीती जॉर्ज, डॉ. (सौ.) सुरेखा मोहोकर, मा. सरपंच श्री. रामेश्वर आंग्रे, डॉ. विलास मोहोकर, श्री. जॉनी जॉर्ज आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या राष्ट्रभक्ती, सामाजिक सुधारणा आणि विचारमूल्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्याचे स्मरण करत, उपस्थित मान्यवरांनी आजच्या पिढीने सावरकरांचे विचार आत्मसात करून देशहितासाठी कार्य करण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित नागरिकांनीही देशभक्तिपर वातावरणात सावरकरांना वंदन करत त्यांची जयंती साजरी केली.
