oppo_0
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
जनतेतून मिळत आहे उत्तम प्रतिसाद…
उरण दि. ३० / विठ्ठल ममताबादे : भाजपचे नेते तथा उरण विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार महेश बालदी, शहराध्यक्ष कौशिक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली उरण नगर परिषदेत भाजप महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवीत असून निवडणूकिची तारीख जवळ आल्याने प्रचाराला आणखीनच रंगत आली आहे.नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा कोळी शाह, प्रभाग क्रमांक ८ चे पूर्वा वैवडे, रोहित पाटील, प्रभाग क्रमांक ९ चे गणेश पाटील, सायली पाटेकर या उमेदवारांमुळे निवडणूक आणखीनच चूरशीची व अधिक रंगतदार बनली आहे.हे सर्वच उमेदवार क्वालिफाईड, उत्तम चारित्र्य संपन्न, उत्तम नेतृत्व, दांडगा जनसंपर्क असल्याने या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.या सर्वच उमेदवारांनी सुरवातीपासूनच उत्तम नियोजनबद्ध प्रचार केला आहे. अनेक वर्षांपासून या उमेदवारांची नाळ जनतेशी जोडलेली आहे. जनतेत चांगल्या कामासाठी या सर्व उमेदवारांचे नाव सतत चर्चेत असते.भाजप महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शोभा कोळी शाह व सर्वच २१ नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप महायुतीचे सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते रांत्रदिवस मेहनत घेत आहेत.
भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोरा गावच्या सुपुत्री शोभा कोळी – शाह या उच्चशिक्षित (बी.एस.सी. पदवीधर) असून समाजसेवेची आवड असणारं व्यक्तिमत्व आहे. कोळी समाजात जडणघडण असल्यामुळे प्रत्येक सामाजिक समस्यांची जाणीव त्यांना आहे. स्वामीनारायण संस्थेच्या व इतर सामाजिक उपक्रमांत त्या कार्यरत असतात, गुजराती नवरात्री मंडळाच्या सक्रिय सदस्य म्हणून सुद्धा त्यांच उरणशी घट्ट नातं आहे! शिक्षण, संस्कार आणि सेवा या तिन्हींचा संगम असलेल्या आपल्या भाजप महायुतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शोभा कोळी-शाह यांना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ८ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार पूर्वा योगेश वैवडे या स्वतः उच्चशिक्षित असून बचत गटामार्फत त्यांनी महिलांना स्वयंरोजगार निर्माण करण्यात मदत केली आहे. भावी पिढीवर योग्य संस्कार व्हावे यासाठी उरण मधील लहान मुलांसाठी संस्कार शिबिरांचे आयोजन सुद्धा त्या करत असतात. तसेच गणेशोत्सव, नवरात्र कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग आणि विविध सामाजिक कार्यक्रमांत त्या नेहमी अग्रेसर असतात.यांनाही जनतेतून चांगला प्रतिसाद मिळत आहे
भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ८ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार ऍड.रोहित पाटील हे सर्वसामान्यांचे नेतृत्व आहे.ऍड.रोहित नितीन पाटील यांचे वडील नितीन गोपीनाथ पाटील माजी नगराध्यक्ष असल्याने लहानपणापासूनच सामाजिक कार्याची आवड जपत जनसेवेचा वारसा त्यांनी पुढे चालू ठेवला. उरणमधील दिव्यांग मुलांसाठी भरीव कार्य केले. अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे.नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर अशा ऍडव्होकेट रोहित नितीन पाटील यांना जनतेची सर्वाधिक पसंती आहे.
भाजप महायुतीचे प्रभाग क्रमांक ९ अ चे नगरसेवक पदाचे उमेदवार गणेश सदाशिव पाटील यांचे वडील महाराष्ट्र पोलीस दलात असल्याने लहानपणापासूनच त्यांनी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राची आवड जपली. ‘महाराष्ट्र पोलीस बॉयस’ संघटनेमार्फत युवकांसाठी मार्गदर्शनपर अनेक उपक्रमांचे यशस्वी आयोजन त्यांनी केले आहे. उरणमधील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात सक्रिय सहभाग असतो नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर असतात अशी ख्याती असलेले गणेश सदाशिव पाटील यांना जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
भाजप महायुतीच्या प्रभाग क्रमांक ९ ब चे नगरसेवक पदाचे उमेदवार सायली विशाल पाटेकर या महिलांचे उत्तम नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व आहेत.उरण शहराच्या विकासासाठी आणि जनसेवेसाठी समर्पित असलेल्या सायली विशाल पाटेकर यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले असून, पाटेकर कुटुंबातील सून म्हणून ओळख आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण आणि महिलांच्या सशक्तीकरणासाठी त्यांनी सातत्याने काम केले असून, संगणक प्रशिक्षणाद्वारे महिलांना स्वावलंबी बनवले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरजू कुटुंबांना मदत आणि पर्यावरण संवर्धन या उपक्रमांतून त्यांनी समाजात सकारात्मक बदल घडवला आहे. भविष्यातील उरणच्या सर्वांगीण विकासासाठी त्या तत्पर आहेत.त्यांनाही जनतेतून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा आत्मविश्वास भाजप महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
