रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अविनाश जाधव / कळंबोली प्रतिनिधी : प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी कामोठा येथे राजमाता जिजाऊ उत्सव समितीच्या वतीने 12 जानेवारी रोजी जिजाऊ मा साहेबांच्या जयंतीचा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. कार्यक्रमांमध्ये भव्य दिव्य व नेत्र दीपक वातावरणामध्ये रॅली काढून व विविध शौर्य प्रात्यक्षिके व गुणवंताचा सत्कार करून साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिजाऊ लाठी काठी पथकाकडून लाठीकाठी व तलवारबाजी ची अविस्मरणीय अशी प्रत्यक्ष के सादर करण्यात आली. या पथकाचा सन्मान स्वराज्याचे शिलेदार येशाची कंक यांचे वंशज सिद्धार्थ दादा कंक हे यांच्या हस्ते करण्यात आला.
समितीतर्फे जयंतीनिमित्त चित्रकला रांगोळी स्पर्धा मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला तसेच दीपा खरात यांनी “पोरी जरा जपून’ या विषयावर नाट्यप्रयोग सादर करण्यात आला त्यामुळे नव्या पिढीतील युवक युवतींना महत्त्वाचा सामाजिक संदेश दिला कार्यक्रमात सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा जिजाऊची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला महिलांसाठी पैठणी हा खेळ कुपन काढून जिजाऊंच्या लेकींचा सन्मान करण्यात आला.
राजमाता जिजाऊ उत्सव समितीचे सर्वेसर्वा दशरथ पाटील यांनी लेखन केलेले ‘चला स्वप्नांच्या दुनियेत जाऊया’ या पुस्तकाचे अनावरण स्वराज्य शिलेदार यांचे वंशज सिद्धार्थ दादा कंक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैभव खरात यांचे राजमाता जिजाऊंच्या जीवन चरित्रावर आधारित ऐतिहासिक महाराष्ट्राचा पोवाडा सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला स्वराज्याचे शिलेदार बांदल घराण्याचे वंशज हरिश्चंद्र बांदल यांचीही उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
राजमाता जिजाऊ उत्सव समिती यांच्यातर्फे विविध कार्यक्रम व कराटे यांचे प्रात्यक्षिक तसेच लाठीकाठी चे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. 
या सोहळ्यास कामोठे कळंबोली येथील अनेक सामाजिक राजकीय व व्यावसायिक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती . या जिजाऊ जयंती निमित्त नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला आहे. या कार्यक्रमाचे विशेष असे कौतुक होत आहे.
