रायगड लोकधारा वृत्तसेवा :
सचिन शं.पाटील / अलिबाग : आजची पिढी ही आत्मविश्वास असलेली आहे. पदव्या घेऊनही बेकार असाल तर आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. आपल्याकडील कौशल्य निर्माण स्वतःला सक्षम करणे गरजेचे आहे. व्यवहार, वास्तव व ॲकेडमीची सांगड घालणे आवश्यक आहे. शिक्षण घेत असताना प्रचंड टक्केवारी काढल्यानंतर स्वतःला सिध्द करण्याची ताकद निर्माण करा. एकतरी छंद जोपासा, वाचनाची आवड निर्माण कला. तुमच्याकडील छंद एकदिवस मोठा करून जाईल असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम यांनी व्यक्त केला.
रसयगड फोयोग्राफर अँड व्हिडीओ ग्राफर असोसिएशन शी सलग्न, अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन व अश्वीनी टीचर्स क्लासेस अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव सोहळा पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी (दि.30)आयोजित करण्यात आला. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी राहूल कदम, पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, , रायगड फोटोग्राफर्स अँन्ड व्हिडीओग्राफर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर मालोदे, खजिनदार जितेंद्र मेहता, अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन चे अध्यक्ष तुषार थळे, उपाध्यक्ष राकेश दर्पे, सचिव विकास पाटील, सहसचिव अमोल नाईक, खजिनदार विवेक पाटील, सहखजिनदार प्रणेश म्हात्रे, कार्याध्यक्ष सुदेश माळी, सहकार्याध्यक्ष सुबोध घरत, सल्लागार सुरेश खडपे, जितू शिगवण, अश्वीनी टिचर्स क्लासेसच्या संचालिका अश्वीनी मेहता, आदी मान्यवर, गुणवंत विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रतिम सुतार यांनी तर विकास पाटील यांनी प्रास्ताविक केले.
एखादा उपक्रम हाती घेतल्यावर तो कायम ठेवणे कठीण आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवची परंपरा आजही अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशनने टीकून ठेवण्याचे काम केले आहे. युवक हे उद्याचे भवितव्य आहेत. आगामी काळात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये एक प्रमुख म्हणून त्यांची भूमिका असणार आहे.त्यामुळे दर्जेदार समाज घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच स्वतःच्या व्यक्तीमत्व विकासावर भर देणे गरजेचे आहे, असे आवाहन पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांनी केले.
अलिबाग तालुक्यातील शाळांमधून दहावीमध्ये प्रथम आलेल्या व अश्विनी टीचर क्लासेस मधील l बारावीच्या परिक्षेत विशेष यश संपादन करणाऱ्या विद्यार्थी आणि फोटोग्राफर्स असोसिएशनच्या पाल्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, फोटोग्राफीसह व्हीडीओग्राफी क्षेत्र सोपा नाही. कारण याच फोटोग्राफीमुळे अनेक क्रांत्या घडल्या आहेत. अलिबाग फोटोग्राफर्स असोसिएशन आपला व्यवसाय सांभाळून सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यामुळे त्यांचे मनापासून कौतूक आहे. एखादा उपक्रम हाती घेतल्यावर तो कायम ठेवणे कठीण आहे. मात्र सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या गुणगौरवची परंपरा आजही टीकून ठेवण्याचे काम असोसिएशनने केले आहे, असे चित्रलेखा पाटील म्हणाल्या.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अलिबागसह रायगड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. आज कर्तृत्ववान विद्यार्थ्यांचा सन्मान होत असल्याचा आनंद आहे. 90 टक्केहून अधिक गुण मिळविण्यासाठी घेतलेली विद्यार्थ्यांची मेहनत महत्वाची असताना पालकांचे श्रेयदेखील मोलाचे आहेत. विद्यार्थ्यांनो तुम्ही ध्येय बिंदू आहात. दहावी बारावीनंतर करिअरच्या शोधात अथवा उच्च शिक्षण घेत असताना तसेच बाहेरच्या जगात वावरत असताना आकर्षण भरपूर असतील. तुमचे भविष्य उज्ज्वल आहे. परंतू आकर्षणाच्या पलिकडे जाऊन स्वतःला घडविण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन अलिबागच्या उपनगराध्यक्ष ॲड. मानसी म्हात्रे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन चे सदस्य अमर मढवी, विजय पाटील, निलेश दुदम, विराज घरत, निलेश बुरांबे, जयेंद्र वाघमारे, सुमित मालोदे यांनी मेहनत घेतली.
