रायगड लोकधरा न्यूज :
महाड : दि. ३१-०३-२०२५ रोजी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियान अंतर्गत, रणरागिणी महिला प्रभागसंघ, वरंध यांची वार्षिक सर्वसाधारण सभा व योजनांची जत्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते, यावेळी रणरागिणी महिला प्रभागसंघा मार्फत राबविलेले नावीन्य उपक्रम, जमा खर्च ताळेबंद, CMEGP, PMEGP, RSETI’s, DDUGKY, सामाजिक सुरक्षा योजने बद्दल मार्गदर्शन करणेत आले, यावेळी महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंचे विविध स्टॉल लावणेत आले होते, तसेच या कार्यक्रम दरम्यान RSETI मार्फत ज्युट बॅग प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षनार्थी यांना प्रमाणपत्र वाटप करणेत आले, यावेळी पंचायत समिती महाड च्या माझी सभापती, मा. श्रीम. सपना मालुसरे मॅडम, पंचायत समिती सदस्य, मा. श्रीम. अपर्णा येरुणकर मॅडम, मा. तालुका अभियान व्यवस्थापक, मा. श्री. संचित पार्टे सर, कौशल्य समन्वयक ( DDUGKY ) , श्रीम. मनाली शिगवण मॅडम, प्रभाग समन्वयक, श्रीम. दर्शना श्रीवर्धनकर मॅडम, श्रीम. योगिता जैतपाळ मॅडम, श्री. सोमनाथ मासाळ सर, जिल्हा उद्योग केंद्र कडून श्री. अविनाश नवगण सर, RSETI’s, फॅकल्टी श्रीम. जिज्ञासा पवार मॅडम, ग्रामपंचायतचे मा. सरपंच, सदस्य, प्रभागसंघ पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी, लिपिका, सर्व समुदाय संसाधन व्यक्ती, व प्रभागातील महिला उपस्थित होत्या, अतिशय खेळीमेळीच्या व उत्सहाचा वातावरणात वार्षिक सर्वसाधारण सभा व योजनाची जत्रा कार्यक्रम संप्पन्न
