रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवानोन्नती अभियानाची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात प्रभावीपणे केली जात आहे, ग्रामीण भागातील कुटुंबाच्या शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढून त्यांचे जीवनात समृद्धी निर्माण करणेसाठी अभियान कटीबद्ध आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा रायगड – अलिबागच्या मा. श्रीम. प्रियदर्शीनी मोरे मॅडम यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हामध्ये उमेद अभियानाची अंमलबजावणी प्रभावीपणे सुरु आहे, ग्रामीण भागातील शेतीकरिता आवश्यक आधुनिक औजारे प्रभासंघाच्या माध्यमातून भाडे तत्वावर देऊन शेतकरी बांधवाचे शेतीमधिल श्रम कमी करुन, कमी खर्चात जास्त उत्पन्न निर्माण करणेसाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती महाड अंतर्गत *रणरागिणी महिला प्रभागसंघ, वरंध येथे “कृषीकन्या औजार बँक”* ची स्थापना आज दि. ३०-०४-२०२५ रोजी खरवली येथे अक्षय तृतीयेच्या शुभमुहर्तावर करणेत आली, या शुभप्रसंगी मा. गट विकास अधिकारी डॉ. स्मिता पाटील मॅडम, मा. तालुका अभियान व्यवस्थापक श्री. संचित पार्टे सर, प्रभाग समन्वयक श्रीम. दर्शना श्रीवर्धनकर मॅडम, कौशल्य समन्वयक श्रीम. मनाली शिगवण मॅडम, प्रभागसंघ पदाधिकारी, ग्रामसंघ पदाधिकारी, प्रभागसंघातील सर्व ICRP, कृषी सखी, पशु सखी, आर्थिक साक्षरता सखी उपस्थिती होते._
