रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुंबई प्रतिनिधी: (सतिश पाटील) :
कविसंमेलन आणि इतर मान्यवरांचा सत्कार सोहळा
शुक्रवार दिनांक 23 जानेवारी रोजी महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनेल तर्फे चॅनलच्या संपादिका सौ जान्हवी भोईर , तसेच चॅनलचे व्यवस्थापकीय संचालक श्री जयेश दामू भोईर यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते… गेली दोन वर्षे महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनेलचे यश पाहता चॅनलचे पत्रकार यांनी केलेली मेहनत, दिलेली साथ लक्षात घेऊन त्यांच्या कर्तृत्वाचा सन्मान व्हावा, आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी नवी उभारी मिळावी या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते…
यावेळी पत्रकार पुरस्कारासह, काव्यसंमेलन तसेच कवी,कवयित्री यांना सन्मानित करण्यात आले… तसेच उपस्थित मान्यवरांना सन्मानित करण्यात आले…या कार्यक्रमाचे उद्घाटक महाराष्ट्र केशरी न्यूजचे संपादक, प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापक मा श्री ओमकार राजेंद्र नागावकर तसेच रायगड यशोभूमी न्यूज चॅनेलचे संपादक मा.श्री.प्रवीण कोळआपटे, तसेच रायगड भुषण प्रा.एल.बी.पाटील , केळवणे गावाचे सुपुत्र एकविरा कला, क्रीडा शैक्षणिक व साहित्यिक संस्था,फिल्म मेकर मा.श्री.तेजस पाटील, नौदल भारतीय सैनिक मा.श्री राकेश बेदी, मा.सैनिक श्री निलेश दिसले,तसेच भारतीय लष्करात गेली 25 वर्षे कार्यरत असणारे रोहा तालुक्यातील रेवली गावाचे सुपुत्र मा श्री संजय शेलार यांच्या वीरपत्नी सौ सुजाता शेलार,रायगड पोलिस कु तेजश्री तुकाराम भोईर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती…
मा.श्री ओमकार राजेंद्र नागावकर, त्यांच्या पत्नी सौ ओवी ओमकार नागावकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन, दिपप्रज्वलन करून पाच ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरूवात केली… उपस्थित मान्यवरांना सन्मानचिन्ह शाल,पुष्पगुच्छ देऊन यथोच्छ त्यांचा सन्मान करण्यात आला… तसेच पत्रकार आणि कवी यांनाही सन्मानचिन्ह पुष्पगुच्छ , शाल देऊन त्यांचाही यथोच्छ सन्मान करण्यात आला… श्री ओमकार नागावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले… तसेच फिल्म मेकर तेजस पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांचे अतिशय सुंदर असे गीत त्यांच्या आवाजात सादर केले…आणि देवकान्हे गावचा परिसर शंभूराजांच्या गीताने प्रफुल्लित होताना पाहायला मिळाला…तसेच श्री प्रवीण कोळआपटे यांनी पत्रकारांना तसेच उपस्थित सर्व नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले… या कविसंमेलनाचे अध्यक्ष रायगड भुषण प्रा.एल बी.पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले… शिवाय सुंदर अशा कविता सादर केल्या… तसेच सावली डिजिटल न्यूजचे संपादक , उत्कृष्ट कवी मा श्री सचिन दादा पाटील यांनीही सुंदर कविता सादर करून मनोगत व्यक्त केले… भारतीय लष्करात देशसेवा करून नुकतेच कुंडलिका कालप्रकल्प याठिकाणी कार्यरत असणारे मा. भारतीय सैनिक श्री निलेश दिसले यांनी तरुणांना मोलाचे मार्गदर्शन केले… आपल्या गावातील,तालुक्यातील, जिल्ह्यातील नव्हें नव्हे तर देशातून प्रत्येक तरुण हा आदर्श व्यक्ती घडावा…यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले…उरणचे भारतीय नौदल सैनिक आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री राकेश बेदी यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले… तसेच देवकान्हे गावाचे पोलिस पाटील मा. श्री.दयाराम भोईर यांना सन्मानचिन्ह शाल , पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोच्छ सन्मान करण्यात आला, मा श्री दया भोईर ,मा श्री दत्ताराम भोईर यांनाही शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही यथोच्छ सन्मान करण्यात आला…कैलास मंडप डेकोरेटर्स डोळवहाळ ऑपरेटर्स कु.प्रतीक भगत यांनाही सन्मानित करण्यात आले..
या कार्यक्रमाला महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनेलचे पत्रकार मा श्री श्यामभाऊ लोखंडे, पत्रकार मा श्री अनंता म्हसकर, पत्रकार मा श्री शहानवाज मुकादम, पत्रकार मा श्री नंदेश गायकर, कवी पत्रकार मा. श्री अजय शिवकर, मा.श्री सचिन दादा पाटील, पत्रकार मा सौ आशा सावंत, ओम साई भजन मंडळ डोळवहळ गावाचे गायक ह.ब.प मा.श्री सुशील बामणे, ह.ब.प मा.श्री संदेश बामणे ,कवयित्री सौ अक्षदा गोसावी, कवयित्री सौ.अश्विनी देशमुख, कवी श्री न. ग. पाटील,सौ शिवकर तसेच देवकान्हे गावाचे ग्रामस्थ, महिला नागरिक उपस्थित होते…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री सौ अक्षदा गोसावी तसेच आभार प्रदर्शन श्री श्यामभाऊ लोखंडे यांनी केले… महाराष्ट्र वेदभुमी न्युज चॅनेलचे व्यवस्थापकीय संचालक मा.श्री जयेश दामू भोईर आणि चॅनलची स्पादिका,कवयित्री,परिचारिका, मा सौ जान्हवी जयेश भोईर यांना सर्व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ,शाल तसेच भरघोस शुभेंच्छांनी सत्कार करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली….
