रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : एसएससी (दहावी) परीक्षेचा नुकताच घोषित झालेला निकालात पंचक्रोशी विद्यालय(बोरगाव) शाळेचा विद्यार्थी कु. सार्थक काळबागे याने ९२.४० टक्के गुण संपादन करून शाळेत प्रथम क्रमांक मिळवित उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कु. सार्थक काळबागे हा आमदार महेश बालदी यांचे स्वीय सहायक प्रवीण काळबागे यांचा पुतण्या असून, त्याच्या या यशाबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी सार्थकचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि जिद्दीच्या जोरावर मिळविलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही सार्थकने याच जिद्दीने प्रगती करत आपल्या कुटुंबासह शाळेचे व परिसराचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. सार्थकच्या यशाबद्दल परिसरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
