रायगड लोकधारा न्यूज : रायगड लोकधारा विशेष : नवीन पनवेल : सर्वसामान्यांसाठी ‘व्यापार जिहाद’ राजकीय वरदहस्त वाले ‘आझाद’ या मथळयाखाली वृत्त प्रसिध्द होताच महापालिकेने लागलीच दखल घेत नवीन पनवेल रेल्वे स्थानकासमोरील पदपथ पादचार्यांना चालण्यासाठी खुले केले. नवीन पनवेल रेल्वेस्थानकासमोरील पदपथ हा संपूर्णपणे फेरिवाल्यांनी व्यापला होता. पदपथावर अक्षरक्ष चालण्यासाठीही जागा उरलेली नव्हती. पादचार्यांना रस्त्यावरुन चालावे लागत असे. रस्त्यात पार्क केलेली वाहने आणि पादचारी यामुळे रस्ताही अरुंद होवून संध्याकाळच्या वेळेस प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत होती. या वाहतूक कोंडीतून पादचार्यांना वाट करुन जावे लागत होते. महापालिकेने आज हा पदपथ मोकळा केला, त्यामुळे या पदपथाने मोकळा श्वास घेतला असला तरी तो काही काळापुरता आभास ठरु नये हिच इच्छा!
